Thursday, June 20, 2024

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज आमंत्रित

 

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे  अर्ज आमंत्रित

 

       अमरावती, दि. 20 (जिमाका): इतर मागास बहूजन कल्याण विभागाअंतर्गत  पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत सन 2024-25 वर्षातील भटक्या जमाती, जाती-(क) प्रवर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र इच्छुक विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती येथे दि. 30 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक माया केदार यांनी केले आहे.

         

             स्वयंम योजनेचे अर्ज घेतांना विद्यार्थ्यांनी महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा. महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट व मागील वर्षाची गुणपत्रिकासह विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सर्व कागदपत्र कार्यालयात सादर करावे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार