उच्च
व तंत्र शिक्षण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
यांचा
22 जून रोजी अमरावती दौरा
अमरावती,
दि. 22 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये
मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा शनिवार,
(दि. 22 जून 2024) रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे:
शनिवार,
दि. 22 जून रोजी सकाळी 6.30 वाजता रवि भवन, नागपूर येथून शासकीय वाहनाने
अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व
राखीव. सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरावती जिल्ह्यातील सर्व
विभागांच्या विभाग प्रमुखांची आढावा बैठक.
सकाळी
10.30 जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरावती जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रमुख
विभागांकडील विकास कामांच्या प्रगतीबाबत आढावा. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय येथे जिल्हा क्रीडा संकुल समिती व विभागीय क्रीडा संकुल समिती आढावा सभा.
दुपारी 12.10 वाजता जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर येथे अमरावती जिल्हा वार्षिक
योजना निधीमधून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उभारलेल्या कॅथ लॅबच्या लोकार्पण
सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.40 शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी
2.10 वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, धामक
(बेलोरा), ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावतीकडे प्रयाण.
दुपारी 3
वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, धामक, ता. नांदगाव खंडेश्वर येथे आगमन व प्राथमिक
आरोग्य केंद्र, नांदगाव खंडेश्वर येथे या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
मातोश्री पाणंद योजनेंतर्गत मंजूर पाणंद रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.
अर्थसंकल्पीय निधीतून . जिल्ह्यातील
बेलोरा -धामक -येवती - पिंप्री - -कलगा -वाघोडा -शेलु - नटवा - फुबगाव रस्ता सुधारणा
प्रजिमा-32 कि. मी. 7/00ते 11/00 या रस्त्याचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
सोयीनुसार धामक ता. नांदगाव खंडेश्वर येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment