प्रवासी
वाहतूक परवाना ऑटोरिक्षा चालकांना बंधनकार; 31 जुलै नोंदणी करा
अमरावती, दि. 26 (जिमाका): मोटार वाहन अधिनियम
1988 चे कलम 66 अन्वये वैध परवाना असल्याखेरीज ऑटोरिक्षा प्रवाशी वाहनांना सार्वजनिक
वाहनांना वापर करता येत नाही. ज्या ऑटोरिक्षा चालक, मालक यांनी अद्यापपर्यंत प्रवाशी
वाहतुक परवाना प्राप्त करून घेतलेला नाही, अशा ऑटोरिक्षा चालकांनी दि. 31 जुलै,
2024 पर्यंत परवाना प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला
पवार यांनी केले आहे.
ऑटोरिक्षा धारकाला ऑटोरिक्षा परवाना प्राप्त
करूनच सार्वजनिक ठिकाणी प्रवाशी वाहतुक करणे अनिवार्य आहे. त्यासाठी महाराष्ट्र मोटार
वाहन नियम, 1989 चे नियम 75 अन्वये परवाना शुल्क 10 हजार रूपये भरणा करणे आवश्यक आहे.
ज्या ऑटोरिक्षा चालक, मालकांनी अद्यापपर्यंत प्रवाशी वाहतुक परवाना घेतला नसल्यास त्यांनी
प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे कार्यालयीन दिवशी विहित शुल्काचा भरणा करून
प्रवाशी वाहतुक परवाना प्राप्त करून घ्यावा.
000000
No comments:
Post a Comment