नागरी सेवा परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण; 28 जूनपर्यंत अर्ज मागविले
अमरावती, दि. 19 (जिमाका) : केंद्रीय
लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा - 2025 च्या पूर्व प्रशिक्षणासाठी विनामुल्य
प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी
प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने राज्यस्तरावरून
घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या
उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने दि. 28 जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक पात्र
विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व
प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता पकडे यांनी केले आहे.
ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज व भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार, दि. 28 जून
2024 पर्यंत आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. 30 जून 2024 पर्यत आहे. प्रवेश
परीक्षा (एन्ट्रन्स एक्झाम) दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार
आहे. परीक्षेचा कालावधी सकाळी 11 ते दुपारी
1 वाजेपर्यंत राहील. याची नोंद संबंधित विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे भारतीय प्रशासकीय
पूर्व प्रशिक्षण केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे. यासंबंधी सविस्तर माहिती, जाहिरात,
परीक्षेचा अभ्यासक्रम, अर्ज तसेच परीक्षेसंबंधी इतर सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे भारतीय प्रशासकीय
सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment