औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरु; 30 जूनपर्यंत अर्ज करा
अमरावती, दि. 25 (जिमाका): येथील शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु
झाली आहे. प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेचे उपसंचालक संजय बोरकर यांनी केले आहे.
शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे एक वर्ष व दोन वर्ष कालावधीच्या विविध
28 ट्रेडमध्ये एकूण 1152 जागा प्रवेशाकरिता उपलब्ध आहेत. यामध्ये एक वर्ष कालावधीचे
कोपा, सेक्रेटरीअल प्रॅक्टिस, स्युइंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफर इंग्लिश, फाउंड्रीमन,
मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन), मेकॅनिक डिझेल मेकॅनिक ट्रॅक्टर, प्लास्टिक प्रोसेसिंग
ऑपरेटर, प्लंबर, वेल्डर आणि वूड वर्क टेक्निशियन यासह दोन वर्ष कालावधीचे आर्किटेक्चरल
ड्राफ्ट्समन, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर आय.सी.टी.एस.एम.
मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राइंडर, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स, मेकॅनिक मोटर व्हेईकल, पेंटर
जनरल रेफ्रिजरेशन अॅड एअर कंडिशनर टेक्निशियन, टूल अॅड डाय मेकर टर्नर, वायरमन इत्यादी
व्यवसाय अभ्यासक्रम यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर
अर्जाची छापील प्रत, सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतीच्या संच्यासह नजीकच्या
आयटीआयमध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजर राहून प्रवेश अर्ज निश्चित करून घ्यावा. अर्ज
निश्चितीची अंतिम तारीख 1 जुलै असून कन्फर्म केलेल्या अर्जाचाच सर्व प्रवेश फेऱ्यासाठी
विचार करण्यात येईल. प्रवेश अर्ज कन्फर्म केल्यावर आपल्या खात्यात प्रवेश करून व्यवसाय
निवड करण्यासाठी संस्थानिहाय विकल्प व प्राधान्याने सादर करता येईल.
संस्थेत अतिशय नाममात्र प्रवेश शुल्क
असून प्रवेशित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये इतके विद्यावेतन सुद्धा
मिळते. प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सर्व सुट्टीचे दिवशी सुद्धा सुरु असून संस्थेमध्ये
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे तथा ऑप्शन फॉर्म भरणे इत्यादी सर्व
सुविधा निशुल्क उपलब्ध आहेत.
आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्वच
विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात रोजगाराची संधी, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये
नोकरीची संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरु करता येऊ शकतो.
तरी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहिती करिता शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इर्विन चौक, मोर्शी रोड, अमरावती येथे संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment