भरडधान्य खरेदी नोंदणीसाठी 20 जूनपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 12 (जिमाका): शासनाकडून भरडधान्य
खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी दि. 21 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तरी पात्र व इच्छूक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग
अधिकारी अजय बिसने यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी
योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांची हमी दराने भरडधान्य ज्वारी नोंदणीसाठी दि.
31 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली. मागील हंगामामधील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रतिसाद
पाहता रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये भरडधान्य खरेदीकरीता मुदत वाढ देण्यात आली आहे.
शेतकरी नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन 7/12, त्यामध्ये पीकपेऱ्याची नोंद असावी, आधार
कार्ड, ॲक्टीव बँक खातेची अचूक माहिती या सर्व तपशिलासह शेतकऱ्यांनी तालुक्याच्या संबंधित
केंद्रावर नोंदणी करावी.
0000
No comments:
Post a Comment