Wednesday, June 12, 2024

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत

नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि. 12 (जिमाका) :  इतर मागास बहुजन समाज कल्याण, अमरावती या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत सन 2024-25 या वर्षातील अर्ज इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. 

             उच्च शिक्षणाच्या व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी दि. 20 जून 2024 रोजी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा शेवटची तारीख 15 जुलै असून निवड यादी दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षासाठी दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याचा शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 असून निवड यादी 2 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

              आधार योजनेचे अर्ज घेताना विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे, त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट व मागील वर्षाची गुणपत्रिका कार्यालयात सादर करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागाच्या सहायक संचालक माया केदार यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...