विभागीय क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन
अमरावती, दि. 14 (जिमाका): केंद्र व
महाराष्ट्र शासनाच्यावतीने दि. 21 जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.
त्याअनुषंगाने विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथील बॅडमिंटन हॉलमध्ये
दि. 21 जुन 2024 रोजी सकाळी 6.30 ते 8 वाजेपर्यंत प्रमुख लोकप्रनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी,
जेष्ठ योग प्रसारक यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार
आहे. तरी सर्व नागरीक, क्रीडा प्रेमी, योग समिती, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी
उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान व जिल्हा क्रीडा
अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
प्राचिन भारतीय संस्कृतीची अवघ्या
जगाला दिलेली एक अमुल्य देन म्हणजे योग होय. माणसाला आंतरबाह्य निरोगी करुन दिर्घ आयुष्य
प्रदान करण्याचे सामर्थ्य योगात आहे. आज संपुर्ण जगाने योगाभ्यासाचा केलेला स्विकार
हे त्याचेच प्रतिक आहे. जीवन तनाव मुक्त, भय केंद्र व मुक्त आणि निरोगी राहावे. तसेच
जिल्हा व तालुकास्तरावर सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये, नागरिकांमध्ये
जाणीव जागृती करणे व योग विषयक आवड निर्माण करणे, योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला
जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग, अमरावती महानगर पालिका, जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती, राष्ट्रीय
छात्र सेना, आरोग्य भारती, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, विदर्भ शासकीय
ज्ञान विज्ञान संस्था, महिला पंतजली योग समिती, रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंग, क्रीडा भारती,
शारिरीक शिक्षक संघटना, नेहरु युवा केंद्र, बृहंमहाराष्ट्र योग परिषद, भारत स्वाभिमान
ट्रस्ट, युवा भारत व किसान पंचायत, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, श्री. शिवाजी
शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती, वंदे मातरम योग प्रसारक मंडळ, जिल्ह्यातील विविध
योग संघटना, खेळ संघटना संस्था, क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यामाने घेण्यात येत
आहे.
0000
No comments:
Post a Comment