क्रीडा प्रबोधिनींतील प्रवेशासाठी राज्य व विभागस्तरीय
चाचणी; जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी
अमरावती, दि. 28 (जिमाका): राज्यातील क्रीडा प्रबोधिनींमध्ये सरळ सेवा प्रवेश
व खेळनिहाय प्रवेशासाठी विभागस्तरावर व राज्य स्तरावर चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार
आहे. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. 2 जुलैपर्यंत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम
राठोड यांनी केले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू
घडविण्याकरिता प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण, अद्ययावत क्रीडा
सुविधा, शिक्षण, भोजन, निवास आदी सुविधा क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनींमध्ये
सरळ सेवा प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचण्यांव्दारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश
देण्यात येणार आहे. यासाठी मैदानी, आर्चरी, ट्रायथलॉन, बॉक्सींग, बॅडमिंटन, शुटिंग,
कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक, फुटबॉल, जलतरण, सायकलींग, हॅण्डबॉल,
ज्युदो आदी खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन करण्यात
येत आहे.
सरळ प्रवेशासाठी प्रक्रिया
क्रीडा प्रबोधिनीशी संबंधित खेळात राज्यस्तरावर
पदक, सहभाग प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले
खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षांआतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळांबाबत चाचणी तज्ज्ञ समितीसमक्ष सादरीकरण
देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळनिहाय कौशल्य चाचणी
क्रीडा प्रबोधिनी संबंधित खेळात राज्यस्तरावर
सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय
कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रम प्रवेश निश्चित केला जातो.
जिल्हास्तरावर क्रीडा प्रबोधिनी चाचणीसाठी
सहभागी होणाऱ्या खेळाडुंची नाव जन्म दि. वय याकरीता जन्माचा दाखला, शाळेचे बोनाफाईट
जिल्हा खेळ प्रकार व क्रीडा कामगिरी या बाबतचे प्राविण्य सहभाग प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, अमरावती येथे दि. 2 जूलै 2024 पर्यंत संकलित करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक खेळाडुंना अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment