Wednesday, June 19, 2024

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

         अमरावती, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

 

             सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी अमरावती स्थानिक वसतिगृहामध्ये कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1 हजार मुलांसाठी शासकिय वसतिगृह युनिट क्र.1, 2, 3 निंभोरा, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा व संत गाडगे महाराज मुलांचे शासकिय वसतिगृह निंभोरा तसेच मुलींसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह कॅम्प अमरावती, गुणवंत मुलींचे शासकिय वसतिगृह जेल रोड, अमरावती तसेच विभागीय स्तरावरील 250 मुलींचे युनिट क्र. 4 अमरावती व 125 जयंती मागासवर्गीय मुलींचे (नविन) विलास नगर, अमरावती तसेच तालुका स्तरावरील मुला, मुलींचे शासकिय वसतिगृह शालेय इयत्ता 8 वी ते 10 व कनिष्ठवरीष्ठ अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे.

                                                     000000

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...