‘प्रति थेंब, अधिक पिक’योजना; अनुसूचित जाती व जमाती
शेतकरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा- कृषी विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 11 (जिमाका): राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब, अधिक
पिक’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्या
जाते. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना
55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिल्या जाते. याच घटकासाठी मुख्यमंत्री
शाश्र्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 25 टक्के व इतर लाभार्थ्यांना
30 टक्के पुरक अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना
45 टक्के अनुदान दिल्या जाते. याच घटकासाठी जिल्हा परिषद मार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील
लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना
35 टक्के पुरक अनुदान इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान दिल्या जाते. अनुसूचित
जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना बिरसा मुंडा योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना
35 टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान दिल्या जाते.
योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाचा
लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्याकडे मालकी हक्काचा सातबारा, 8 अ व ओलीताची सोय असणे आवश्यक
आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक
राहिल.
000000
No comments:
Post a Comment