कृषी
पुरस्कारः 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले
अमरावती, दि. 14 (जिमाका): कृषी विभागामार्फत
कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था, अधिकारी
व कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता
कृषी भूषण, कृषी भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक
शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार व युवा शेतकरी पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविले जाते.
सन 2023 व 2024 या वर्षासाठी पुरस्काराचे प्रस्ताव कृषी
विभागाने मागविले असून प्रस्ताव दि. 31 जुलै 2024 पर्यंत पाठवावयाचे आहेत. शेतकऱ्यांनी
पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याकरिता व अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक,
कृषी पर्यवेक्षक किवा नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment