बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंध समितीचा अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;
समितीने
प्रभावीपणे काम करावे- सुरज वाघमारे
अमरावती, दि. 14 (जिमाका): बोगस डॉक्टरांना
आळा घालण्यासाठी तक्रारींवरील कार्यवाहीबरोबरच स्थापित समितीने स्वत:हून पुढाकार घेऊन
कारवाई केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे शहरी व
तालुका स्तरावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या पदव्या, नोंदणी आदी बाबींची
तपासणी करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी आज येथे दिले.
बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्रतिबंध समितीच्या
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. पोलीस उपअधिक्षक अर्जुन ठोसरे, पोलीस
निरिक्षक राहुल आठवले, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ,
जिल्हा आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारीसे, सहायक माहिती
अधिकारी सतिश बगमारे आदी उपस्थित होते.
बोगस डॉक्टरांविरुद्धच्या तक्रारींची
दखल घेत अद्यापपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक प्रमाणे 2 गुन्हे दाखल करण्यात
आले असून त्यावर कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती श्री. ठोसरे यांनी दिली. केवळ तक्रारींची
वाट न पाहता शहरी व तालुका समित्यांनी पुढाकार घेऊन तपासणी करावी. सर्व खासगी वैद्यकीय
व्यावसायिकांची कागदपत्रे तपासावीत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी यासाठी अधिक प्रभावीपणे
काम करावे, असे सूचना अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी दिले.
00000
No comments:
Post a Comment