Tuesday, June 18, 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत नाविण्यपुर्ण प्रशिक्षण योजना; 12 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत नाविण्यपुर्ण प्रशिक्षण योजना; 12 जुलैपर्यंत अर्ज मागविले

 

          अमरावती, दि. 18 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीसाठी नाविण्यपुर्ण योजनेतंर्गत  व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक अर्जदारांनी प्रशिक्षणासाठी दि. 12 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

 

         मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाचे सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यालयाकडुन सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अमरावती जिल्ह्यासाठी 500 विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दीष्टे प्राप्त झाले आहे.  त्याकरीता इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या विहीत नमुण्यातील अर्ज प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस कमिशनर कार्यालयामागे अमरावती येथे सादर करावा.

 

       आवश्यक कागदपत्रे : अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा), अर्जदाराचा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा 3 लाखापर्यंत तहसिलदार यांच्याकडुन घतेलेला असावा), नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो, रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, प्रशिक्षणर्थी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील असावा, प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा, 10 प्रशिक्षणार्थीचे वय 18 ते 50 वर्ष असावे, प्रशिक्षणार्थ्यांनी यापुर्वी शासनाच्या महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल, प्रशिक्षणार्थ्यांनी आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील सादर करावा.

                             00000

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...