Thursday, June 20, 2024

मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी’ सुविधा; कुटूंबासोबत साधू शकणार संवाद

 मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी’ सुविधा; कुटूंबासोबत साधू शकणार संवाद

 

          अमरावती, दि. 20 (जिमाका): अमरावती मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाने कैद्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी’ सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. आर. देशपांडे व जिल्हा सत्र न्यायाधिश एच. एल. मनवर यांचे हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक किर्ती चिंतामणी तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

         कारागृहातील 1300 ते 1400 कैद्यांना स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी सुविधेमुळे आठवडयातून तीनवेळा महिण्यातून 12 वेळा 6 मिनीटे 72 रुपयांमध्ये त्याच्या वकील व कुटुंबीयांसोबत संवाद साधू शकणार आहेत. कैद्यांचा त्यांच्या नातेवाईकांसोबत अधिक वेळ संवाद झाल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल व त्यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल होऊन त्यांचे मनपरिवर्तन होईल, असा विश्वास कारागृह अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...