शहरात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि.18 (जिमाका) : शहरात शांतता
व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त
(अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक
आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा
व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात
आला असून दि. 22 जून ते 4 जुलै 2024 च्या
मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई
करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)
नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment