धारणी विधानसभा मतदार संघातील
उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
अमरावती, दि. 31 (जिमाका):
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा
करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात येत
आहे. यासाठी धारणी विधानसभा मतदारसंघातील
सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन
41-मेळघाट क्षेत्र
धारणीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर
2024 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत,
दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर
2024 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण उपकोषागार
कार्यालय धारणी जि. अमरावती येथे राहील.
जर उपरोक्त दिनांकाला सर्व
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित
उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी दुपारी 3 ते सायंकाळी 5
वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
मेळघाट विधासभा मतदारसंघ,
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक
त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध
करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही
उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार
कार्यवाही करण्यात येईल.
00000
तिवसा विधानसभा मतदार संघातील
उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
अमरावती, दि. 31 (जिमाका):
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा
करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात येत
आहे. यासाठी तिवसा विधानसभा मतदारसंघातील
सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन
तिवसा उपविभागीय
अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नु पी. एम. यांनी केले आहे.
पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर
2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत,
दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर
2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. तपासणीचे ठिकाण तहसिल
कार्यालय तिवसा येथे राहील.
जर उपरोक्त दिनांकाला सर्व
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित
उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5
वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
तिवसा विधासभा मतदारसंघ,
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक
त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध
करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही
उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार
कार्यवाही करण्यात येईल.
00000
अचलपूर विधानसभा मतदार संघातील
उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
अमरावती, दि. 31 (जिमाका):
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा
करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात येत
आहे. यासाठी अचलपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे
आवाहन 42-अचलपूर विधानसभा मतदार संघ, निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत
अरखराव यांनी केले आहे.
पहिली तपासणी दि. 8 नोव्हेंबर
2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, दुसरी तपासणी दि. 12 नोव्हेंबर
2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, तिसरी तपासणी दि. 16 नोव्हेंबर 2024
रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत
राहील. तपासणीचे ठिकाण नविन प्रशासकीय इमारत, उपविभागीय अधिकारी कार्यालय, परिसर,
अचलपूर येथे राहील.
जर उपरोक्त दिनांकाला सर्व
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित
उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5
वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
42-अचलपूर विधासभा मतदारसंघ,
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक
त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध
करून द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही
उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार
कार्यवाही करण्यात येईल.
00000
बडनेरा
मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन
अमरावती, दि. 31 : बडनेरा विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रवि रंजन
कुमार विक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीशी संबंधित तक्रारींसाठी
त्यांच्याशी संपर्क करता येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३७ बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी
रवि रंजन कुमार विक्रम यांची सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा
भ्रमणध्वनी क्रमांक ९०२१७९८०५५ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून
विजय संतान यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०२८९४५५५८ असा आहे.
निवडणूक निरीक्षक यांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते ११ अशी आहे. त्यांना चंद्रभागा कक्ष,
शासकीय विश्राम गृह, अमरावती याठिकाणी भेटाता येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment