विधानसभा निवडणुकीचा
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
*मंगळवारपासून नामांकन अर्जास
सुरूवात
*अमरावती, बडनेरा मतदारसंघाची
पाहणी
*सरमिसळनंतर मतदानयंत्र रवाना
अमरावती, दि. 21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
झाले आहे. मंगळवार, दि. 22 ऑक्टोबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार
आहे. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कामाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. तसेच सरमिसळ केल्यानंतर मतदानयंत्र
संबंधित विधानसभा क्षेत्रात आजपासून पाठविण्यास सुरूवात करण्यात आली.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात दोन हजार 708 मतदान केंद्र
राहणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदानयंत्राच्या 25 टक्के अधिक मतदान यंत्र
उपलब्ध झाले आहे. मतदान यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी केली आहे. ही मतदान यंत्रे
स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आले आहे. सरमिसळनंतर या मतदानयंत्रांचे
विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप आजपासून लोकशाही भवनातून सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक मतदारसंघाला 20 टक्के अधिक मतदानयंत्र वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान आज जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यांनी अमरावती आणि
बडनेरा मतदारसंघाच्या नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येत असलेल्या कार्यालयाची
पाहणी केली. अमरावती मतदारसंघासाठी तालुका प्रशासकीय भवनात नामनिर्देशनपत्र दाखल
करण्याची पाहणी केली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना योग्य त्या
सुविधा देण्यात याव्यात. खर्च आणि परवानग्यांची योग्य माहिती देण्यात यावी.
उमेदवारांना अर्ज, नमूने आणि आवश्यक त्या सूचना एकाचवेळी देण्यात याव्यात.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. परिसरात
अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देशही श्री.
कटियार यांनी दिले.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा. निवडणूक
प्रक्रिया ही पारदर्शी होणार आहे. त्यामुळे कोणतीही शंका आल्यास कार्यालयाशी संपर्क
साधावा. समस्यांबाबत अचूक माहिती घ्यावी, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले.
00000
अमरावती जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर
निर्बंध लागू
अमरावती, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत निवडणूक लढविणाऱ्या सर्व
उमेदवारांच्या वाहनावरील ध्वनीक्षेपकामुळे ध्वनीप्रदूषण होते. परिणामी सामान्य नागरिकांच्या
जीवनातील शांतता व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे भारतीय नागरी
सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार निवडणूक आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. या नियमानुसार
निवडणूक काळात जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून, त्याविषयीचा
आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केला आहे.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये
प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निवडणुका विना अडथळा व शांततेत पार पडण्यासाठी
निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक वापरावर आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. कोणतीही व्यक्ती,
संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा वापर) सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या
पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावरील
ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपकाचा वापर सकाळी
6 ते रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही.
हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण
होईपर्यंत दि. 23 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी
श्री. कटियार यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
0000
आचारसंहिता काळात शासकीय परिसरात
मिरवणुका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व शासकीय,
निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा
तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय
अधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश 23 नोव्हेंबरपर्यंत अंमलात
राहणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम
घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2024ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त, न्याय वातावरणात
पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व
तहसील कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय
विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने
किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय
कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स,
कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्स लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, आवारात निवडणूकविषयक
घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे तसेच निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल,
अशी कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.
निवडणूक कालावधी कायदा व
सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता अन्वये अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वत्र शस्त्र वापरावर
निर्बंध जाहीर आले आहेत. यानुसार निवडणूक कार्यक्रम झाल्यापासून ते निवडणूक
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शस्त्र परवानाधारकास
शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे
कलम 144 सुधारणा कायदा भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूक
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 23 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश
जिल्हादंडाधिकारी श्री. कटियार यांनी दिले आहेत.
0000
सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण
करण्यास निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्या कालावधीत सार्वजनिक मालमत्तेचे
प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विद्रुपीकरण करण्यास निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून
शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण
करण्यास भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी सौरभ
कटियार यांनी निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत
म्हणजे दि. 23 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू केले आहेत.
0000
नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराने नियमांचे पालन करावे
- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून, दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात
नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस ताफ्यामध्ये तीन मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश
असावा. तसेच नामनिर्देशन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती
उपस्थित राहतील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच
दालनात या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला
जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे
कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे,
कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा
निवडणूक प्रचार करण्यास जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भारतीय नागरी
सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश
दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू राहणार आहेत.
00000
नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून, दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विधानसभा
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा
त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या
मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून
देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद
वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे या बाबीवर
निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये
जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले
आहेत.
0000
मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा
वापर करण्यास निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने
विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून
आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.
अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून
कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी
तीन पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक
आहे.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी सौरभ
कटियार यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या
ताफ्यामध्ये तीनपेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण
होईपर्यंत दि. 23 नोव्हेंबर, 2024 पर्यंत निर्बंध घातल्याचे आदेश दिले आहेत.
000
निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म,
भाषावार शिबिरांच्या आयोजनास निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. तसेच सर्व संबंधितांना नोटीस देऊन
त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्य परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक
आहे.
अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून
निवडणूक कालावधीमध्ये कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धर्म, भाषावाद शिबिरांचे आयोजनावर
निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी भारतीय नागरी सुरक्षा
संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिले आहेत. हे आदेश दि. 23 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू
राहणार आहेत.
000
धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांच्या जवळपास
तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या जवळपास तात्पुरती
पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी
सौरभ कटियार यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यातील
धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये
स्थापन करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 23 नोव्हेंबर, 2024 पर्यंत
निर्बंध घातल्याचे आदेश दिले आहेत.
0000
सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, रस्त्यावर
निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यास निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी
सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स,
पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण
होऊ शकतो. तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय नागरी सुरक्षा
संहिता 2023 चे कलम 163 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी
सौरभ कटियार यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. 23 नोव्हेंबर,
2024 पर्यंत निर्बंध घातले आहेत.
00000
धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने,
उपोषण करण्यावर निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
अमरावती जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून
सभा, मिरवणुका, निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित करणे आवश्यक असल्याने जिल्हा
दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये
निवडणूक कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसील
कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृह या ठिकाणी सार्वजनिक व रस्त्यावर
धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर घालण्याचे आदेश दिले आहेत.
हे आदेश दि. 23 नोव्हेंबर, 2024 पर्यंत
लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000
प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे
कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी निर्बंध
अमरावती, दि. 21 (जिमाका): भारत निवडणूक
आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर,
2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.
अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची
संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून
निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक
लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात
येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबींसाठी बंधन
घालणे आवश्यक आहे.
त्यासाठी जिल्हादंडाधिकारी सौरभ
कटियार यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पुढीलप्रमाणे आदेशाद्वारे
निर्बंध घातले आहेत. यामध्ये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या
बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. तसेच तो त्या वाहनाच्या टपापासून
2 फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन
चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही
बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा
कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक
प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त
इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश दि. 23 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू
राहणार आहेत.
0000
No comments:
Post a Comment