*निवडणूक निरीक्षकांच्या सूचना
अमरावती, दि. 30
(जिमाका) : निवडणुकीतील प्रत्येक उमेदवारांना सहकार्य करावे. त्यांना प्रचारासाठी आवश्यक
असलेली परवानगी तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी एक खिडकी कार्यान्वित
करण्यात यावी. परवानगी, तसेच तक्रारींचा निपटारा तातडीने करावा, अशा सूचना निवडणूक
निरीक्षकांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या चारही सामान्य निरीक्षकांनी आज आढावा घेतला. यावेळी
निवडणूक सामान्य निरीक्षक रवि रंजन कुमार विक्रम, श्याम लाल पुनिया, लक्ष्मीशा जी,
बिधानचंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता
महोपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा
पोलिस अधीक्षक विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक यांनी
मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्यात. प्रामुख्याने उमेदवारांना
देण्यात येणाऱ्या विविध परवानगीसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. उमेदवारांना प्रचाराची
परवानगी सुलभरित्या मिळाल्यास ते खर्चही व्यवस्थित देतील. मतदानासाठी नागरिकांनी पुढाकार
घ्यावा, यासाठी कमी मतदान असलेल्या आणि शहरी भागामध्ये जनजागृतीचे अभियान राबविण्यात
यावे, अशा सूचना केल्यात.
बैठकीत जिल्हाधिकारी
श्री. कटियार यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली. प्रामुख्याने
मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा जंगल आणि रिमोट असल्याने यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात
आले आहे. येथील सर्व मतदान केंद्र पर्यायी व्यवस्थेने संपर्कात राहतील, याची व्यवस्था
करण्यात आली आहे. तसेच मतदार यादी अंतिम करण्यात येत असून नव्याने गेल्या कालावधीत
एक लाखाहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदानासाठी पुरेशा प्रमाणात
ईव्हीएम मशीन्स उपलब्ध असून त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी यांच्याकडे
पाठविण्यात आल्या आहे.
मतदानावरील बहिष्काराची
अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. परंतु जिल्हा प्रशासन यावर पूर्ण लक्ष ठेऊन आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या भागात स्वीपचे उपक्रम राबविण्यात येत आहे.
गेल्या लोकसभेच्या मतदानात तीन टक्के वाढ झाली आहे. नियंत्रण कक्ष, स्ट्राँगरूम सुसज्ज
आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी आणि परवानगीसाठी जिल्हास्तरावर सुविधा निर्माण करण्यात
आली आहे. त्यामुळे उमेदवारांना कोणताही त्रास होणार नाही. निवडणूक निरीक्षकांची माहिती
आणि संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्या समस्यांबद्दल
थेट संपर्क साधू शकतील, असेही श्री. कटियार यांनी सांगितले.
00000
तिवसा विधासभा मतदारसंघासाठी
निवडणूक निरीक्षक
श्याम लाल पुनिया यांच्या
भम्रणध्वनी क्रमांकामध्ये बदल
अमरावती, दि. 30 (जिमाका): विधासभा सार्वत्रिक
निवडणूक-2024 चे अनुषंगाने 38-अमरावती विधानसभा मतदार संघ व 39-तिवसा विधासभा
मतदार संघासाठी श्याम लाल पुनिया हे
निवडणूक निरीक्षक म्हणून अमरावतीत दाखल झालेले आहे.
श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक
यांच्या मुक्काम आज दि. 29 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुख्य शासकीय
विश्रामगृह, अमरावती येथे राहील. 038-अमरावती विधासभा मतदार संघ व 039-तिवसा
विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक
आयोगामार्फत त्यांची नियुक्ती केलेली असून सामान्य नागरिकांच्या निवडणूक विषयक
काही तक्रारी किंवा सूचना असतील तर श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक यांच्याशी
सकाळी 10 ते 11 वेळेत पूर्णा कक्ष, मुख्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे संपर्क
साधता येईल. त्यांचा संपर्क क्रमांक 9172760284 हा राहील. तसेच त्यांचा मेल आयडी shyamlal.poonja@ias.nic.in
यावरही सामान्य नागरिकांना आपल्या निवडणूकविषयक काही तक्रारी किंवा सूचना असल्यास
सादर करता येईल, अशी माहिती 38-अमरावती विधासभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी,
अमरावतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
00000
संशयास्पद बँकीग व्यवहाराची माहिती
तातडीने
सादर करण्याबाबत खर्च निरीक्षकांचे
आदेश
अमरावती,
दि. 30 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गर्मित केलेली
आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात दिनांक 20
नोव्हेंबर2024 रोजी निवडणूक होणार असून निवडणुका शांततापूर्ण, भयमुक्त व पारदर्शकरित्या
पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे.
निवडणुक
काळातील संशयास्पद बँकीग व्यवहाराची माहिती खर्च निरीक्षक यांना उपलब्ध करुन देण्याबाबत
अग्रणी बँक, सर्व शासकीय व खाजगी बँक तसेच सह निबंधक, सहकारी पतसंस्था, अमरावती यांची
सभा खर्च निरीक्षक वेंकन्ना तेजावथ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आयोजित करण्यात आली. या सभेत उपस्थित सर्व
बँक अधिकारी व सह निबंधक यांना निवडणुक आयोगाने निर्देशीत केल्याप्रमाणे सर्व संशयास्पद
व्यवहारांची माहिती विनाविलंब सादर करण्याची सूचना देण्यात आल्या.
नोडल अधिकारी विजय देशमुख, सहायक नोडल
अधिकारी दिनेश मेतकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अतुल खानजोडे तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी, सहकारी पतसंस्थांचे सह निबंधक आदी यावेळी उपस्थित होते.
00000
बडनेरा विधानसभा मतदार संघातील
उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
अमरावती, दि. 30 (जिमाका): विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक यांच्याशी चर्चा करून
प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी
वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील सर्व
उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन 37 -बडनेरा विधानसभा, मतदार संघाचे
उपजिल्हाधिकारी महसूल तथा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जाधव यांनी केले आहे.
पहिली
तपासणी दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, दुसरी
तपासणी दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, तिसरी
तपासणी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील.
तपासणीचे ठिकाण निवडणूक खर्च तपासणी कक्ष,उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुनी अमरावती
तहसिल कार्यालय, अमरावती येथे राहील.
जर उपरोक्त दिनांकाला सर्व
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही तर उर्वरित
उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5
वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
बडनेरा विधासभा मतदारसंघ, विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या
सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून
द्यावे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, तपासणी अनिवार्य असल्याने कोणत्याही
उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार
कार्यवाही करण्यात येईल
00000
अमरावती विधानसभा मतदार संघातील
उमेदवाराच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर
अमरावती,
दि. 30 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खर्च निरीक्षक
यांच्याशी चर्चा करून प्रत्येक उमेदवाराची खर्च नोंदवही तपासणीसाठी वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. यासाठी अमरावती
विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन
अमरावती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय
अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
पहिली तपासणी दि. 7 नोव्हेंबर 2024
रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत,
दुसरी तपासणी दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, तिसरी
तपासणी दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील.
तपासणीचे ठिकाण अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील पहिला माळ्यावरील सभागृह,
नवीन प्रशाकीय इमारत, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन समोर, अमरावती येथे राहील.
जर उपरोक्त दिनांकाला सर्व
उमेदवारांच्या लेख्यांची तपासणी वेळेअभावी पूर्ण होऊ शकली नाही, तर उर्वरित
उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5
वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
अमरावती विधासभा मतदारसंघ, विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेखे आवश्यक त्या
सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करून
द्यावे. तपासणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने कोणत्याही
उमेदवाराने किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने अनुपस्थित राहू नये, अन्यथा नियमानुसार
कार्यवाही करण्यात येईल.
00000
सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी
तपासून आणण्याचे
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचे
आवाहन
अमरावती, दि. 30 (जिमाका): शासनमान्य
हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी व्यवस्थित वाळवून
त्यामधील आद्रतेचे प्रमाण 12 टक्केपेक्षा कमी असल्याची व एफएक्यू दर्जाचे सोयाबीन
असल्याची खात्री करावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर
आणून त्यातील आर्द्रता तपासावी व ती 12 टक्केपेक्षा कमी असल्यासच सोयाबीन खरेदी
केंद्रावर विक्रीसाठी आणावे. जेणेकरून जास्त आर्द्रतेमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन परत
न्यावे लागणार नाही, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.
00000
जिल्हाधिकारी यांचा शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथे पाहणी दौरा
अमरावती,
दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
अमरावती येथे पाहणी व निरीक्षण दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी
यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन), शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत, मुलींचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, ग्रंथालय, व्याख्यान
गृह इत्यादींची प्रत्यक्ष पाहणी केली. दौऱ्यादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील
विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांनी इर्विन व
डफरीन येथील वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र
कक्ष, इर्विन येथे नवीन तयार होणारे ह्दययरोग अतिदक्षता विभाग या इमारतींना भेट देऊन
आवश्यक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर
डफरिन रुग्णालय येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक इमारत, व्याख्यानकक्ष,
ग्रंथालय, वसतिगृहे इत्यादी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली .व तेथे उपलब्ध असलेल्या सोयी
सुविधांबाबत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास
आवश्यक असलेल्या बाबींचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना तसेच इतर उपलब्ध निधीतून आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्यात
येईल, असे सांगितले. अमरावती येथे सुसज्ज कम्प्युटराइज
व्याख्यान कक्ष, मायनर ओटी येथील सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला.
जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभाग
कार्यकारी अभियंता श्री. गिरी, उप अभियंता बांधकाम विभाग श्री. काळे, आरोग्य विभागाचे उप अधिष्ठाता डॉ. नितीन अंभोरे,
प्रशासकीय अधिकारी संजय मैदानकर, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक डॉ.
अमोल नरोटे, जिल्हा स्त्री रुग्णालय डफरिन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार आदी
यावेळी उपस्थित होते.
00000
जिल्हा स्वीप कक्ष व फटाका असोसिएशनमार्फत
मतदार जनजागृती
उपमुख्य
कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, सामान्य प्रशासन अधिकारी संजय राठी,प्रशासन अधिकारी
राहुल पवार, चिल्लर फटाका विक्रेते सचिव राजाभाऊ उंबरकर, जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर
घाटे, संजय राठी, नितिन माहोरे, श्रीकांत मेश्राम, हेमंतकुमार यावले, राजेश सावरकर
उपस्थित होते. यावेळी उपस्थित मतदारांना मतदानाची शपथ देण्यात आली.
जिल्हा
स्वीप कक्षाव्दारे आगामी काळात विविध जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये जिल्हा स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा, सर्व सामाजिक, व्यापारी, औद्योगीक, शैक्षणिक
संघटना इत्यादीच्या सहभागाने व महानगर पालिका तथा क्रीडा विभागाच्या सहकार्याने जवळपास
50 हजार नागरिकांची मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात येणार आहे. सर्व विधानसभा मतदार
संघाअंतर्गत मतदान जनजागृती संदर्भात तालुका स्वीप नोडल अधिकारी व चमूमार्फत विविध उपक्रम, मतदान जनजागृती उपक्रम, महिला व बाल
कल्याण विभाग, आरोग्य व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अंगणवाडी सेविका, मदतनीस,
आशा वर्कर व बचत गटातील महिला यांचा पिंक फोर्स तयार करुन गृह भेटीव्दारे महिला मतदारांमध्ये
जनजागृती करणे या बाबींचा समावेश आहे.
0000
No comments:
Post a Comment