जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन
अमरावती, दि.17 (जिमाका) : 'रामायण' महाकाव्याचे रचनाकार महाकवी
महर्षि वाल्मिकी यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
महसूल भवनात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल
भटकर यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000
शहरात कलम 37 (1) व (3) लागू
अमरावती, दि. 17 (जिमाका) : शहरात शांतता व
सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलिस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1)
व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
सदर
प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस
आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून दि. 18 ऑक्टोबर ते दि. 1 नोव्हेंबर 2024 च्या
मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर
कारवाई करण्यात येईल, असे अमरावती शहर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.
000
दर्यापूर येथील शासकीय वसतिगृहाच्या इमारतीसाठी
प्रस्ताव आमंत्रित
अमरावती, दि. 17 : दर्यापूर
येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारत आवश्यक आहे. यासाठी इमारती
मालकांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष
सहाय विभागाचे दर्यापूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येते.
या वसतिगृहासाठी 100 मुलींच्या वास्तव्याच्या दृष्टीने निवासासाठी खोल्या,
स्नानगृह, स्वच्छतागृह, 10 विद्यार्थिनींमागे एक असणे गरजेचे आहे. तसेच स्वयंपाकगृह,
भोजनकक्ष, वाचनकक्ष, संगणकक्ष, मनोरंजन कक्ष, गृहपाल, अधिक्षक निवासस्थान,
पाण्याची व्यवस्था अशा सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज अशी इमारत दर्यापूर येथे
भाडेत्वावर देण्यास इच्छुक असणाऱ्यांनी 125वी जयंती मागासवर्गी मुलींचे शासकीय
वसतिगृह, सांगळूदकर कॉम्प्लेक्स, बनोसा, दर्यापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment