Monday, October 28, 2024

DIO NEWS AMRAVATI 28.10.2024

 






अमरावती विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी

विशेष सुविधा आणि जनजागृती उपक्रम

अमरावती, दि. 28 (जिमाका):  आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने, अमरावती जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या उद्देशाने स्वीप (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती आणि सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. याचे उद्घाटन स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रांत दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेबद्दल आणि उमेदवारांच्या चिन्हांची माहिती ब्रेल लिपीतून दिली जात आहे. अमरावती जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक दिव्यांग मतदार आहेत, आणि त्यांना सुगम पद्धतीने मतदान करता यावे यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहेत. प्रत्येक दिव्यांग मतदारापर्यंत पोहोचून त्यांचे मतदान सुनिश्चित करण्याचा संकल्प स्वीप विभागाने व्यक्त केला आहे.

दिव्यांग मतदार नोडल अधिकारी जया राऊत यांनी सांगितले की, दिव्यांग मतदारांना मतदानाचा अनुभव सोपा आणि सुगम होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर, सहाय्यक दिव्यांग नोडल अधिकारी मुद्गगल, निरीक्षक पुरुषोत्तम शिंदे, तसेच अनेक दिव्यांग मतदार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज मुद् गल यांनी तर सुञसंचालन संकेत पाटिल यांनी आभार पी.डी.शिंदे यांनी मानले,यावेळी जिल्हातील समाज कल्याण विभागाचे अधिकारी,कर्मचारी,दिव्यांग प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,नितिन माहोरे,हेमंतकुमार यावले,राजेश सावरकर यांचे सहकार्य लाभले.

0000










अमरावतीत दिवाली विथ माय भारत

अमरावती, दि. 28 (जिमाका): ‘दिवाळी विथ माय भारत’ अंतर्गत मेरा युवा भारतच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त  27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत नेहरू युवा केंद्राच्या समन्वयाने बाजाराची स्वच्छता, वाहतुक नियम, वाहतुक व्यवस्थापन, दवाखान्यातील  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती याबाबबत जनजागृती नेहरू युवा केंद्राचे, सरस्वती इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग आणि मातोश्री विमलाबाई देशमुख विद्यालयाचे स्वयंसेवक करणार आहेत.

दिवाळी विथ माय भारत अंतर्गत कृषी उत्पन्न् बाजार समिती येथे स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी मंदा नांदुरकर आणि नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यावेळी उपस्थित होत्या. स्वयंसेवकांनी मार्केटमधील विक्रेत्यांना सिंगल युज प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत जागरूक केले. स्वयंसेवकांना सहायक पोलीस आयुक्त संजय खताले यांनी वाहतुक नियम आणि व्यवस्थापन याविषयी माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.

दिवाळी विथ माय भारत अंतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सरस्वती नर्सिंग इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांनी प्रधान मंत्री जन आरोग्य योजना बाबत  रूग्णांना माहिती दिली आणि आभा आयडी कार्ड बनवून दिले. दिवाळी विथ माय भारत हा युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयचे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यात युवकांना उद्योजकता आणि करिअरशी संबंधित प्रशिक्षण घेता येईल,  असे श्रीमती बासुतकर यांनी सांगितले.

00000

सणउत्सव कालावधीत पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

अमरावती, दि. 28(जिमाका): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यादिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवार नामांकन पत्र दाखल करणार आहेत. सभांचे आयोजन व शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येतात व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 अन्वये सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 29 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी निर्गमित केले आहे.

 

रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सक्षम अधिका-यांनी या अधिनियमाच्या कलम 33, 35, 37 ते 40, 44 व 45 अन्वये कार्यवाही करावी, असे पोलीस आयुक्त यांच्या आदेशात नमूद केले आहे.

 

0000


 















जिल्ह्यात आज 77 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

अमरावती, दि. 28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 77 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे – 9, बडनेरा – 13, अमरावती - 10,  तिवसा – 12, दर्यापूर – 11, मेळघाट – 7,  अचलपूर – 8,  मोर्शी – 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

36 धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात विजय शामराव शेंडे – अपक्ष, मनिष वीरेंद्र जगताप, हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे – बहुजन महा पार्टी, योगेंद्र एकनाथ पाटील – बहुजन समाज पार्टी, अभिलाषा चंद्रशेखर गजभिये – अपक्ष, विरेंद्र वाल्मिक जगताप – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अमोल प्रभाकर बिरे – अपक्ष, संदिप कृष्णराव वाट – अपक्ष, सुभाष रामाजी भोयर – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

37 बडनेरा विधानसभा मतदारसंघातून मुन्ना नारायणसिंग राठोड - अपक्ष, सुरज नारायण घरडे – अपक्ष, श्रीकांत बाबुराव फुलसावंदे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), प्रशांत पंजाब जाधव  - अपक्ष, उत्तम किसनराव तिरपुडे - पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक), नितीन बाबाराव कदम - अपक्ष, राहुल प्रकाश श्रृंगारे - अपक्ष, सुरेश पुंडलिक मेश्राम - अपक्ष, मंजुषा प्रशांत जाधव - अपक्ष, गिरीश हरिदास बारबुद्धे - अपक्ष, संजय देवरावजी महाजन - राष्ट्रीय समाज पक्ष, प्रीती संजय बंड - अपक्ष, सुनंदा जयराम अभ्यंकर - अपक्ष यांनी नामांकन अर्ज सादर केले.

38 अमरावती विधानसभा मतदारसंघात सैय्यद अबरार सैय्यद मजीद - प्रहर जनशक्ती पार्टी, जगदिश मोतीलाल गुप्ता – अपक्ष, पुरूषोत्तम किसन बागडी – अपक्ष, सुलताना परवीन मोहम्मद जाकीर – अपक्ष, मेराजुनिस्सा अब्दुल शकील - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), शेख युसुफ – अपक्ष, बबल हरिभाऊ रडके – अपक्ष, पाटील पप्पु उर्फ मंगेश मधुकरराव – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विजय माणिकराव ढाकुलकर – अपक्ष, अविनाश हरिशचंद्र धनवटे - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

39 तिवसा विधानसभा मतदारसंघात विनोद किसन भालेराव - अपक्ष, शुभम विजय गजभिये - भारतीय युवा जन एकता पार्टी, दिनकर रामदास सुंदरकर - अपक्ष, राजीव बक्षी जामनेरकर - विकास इंडिया पार्टी, शिल्पा नरेंद्र कठाणे - जनवादी पार्टी, प्रवीण मारोतराव देशमुख - अपक्ष, युसुफ शा बिस्मिल्ला शा - अपक्ष, राजेश श्रीरामजी वानखडे - भारतीय जनता पक्ष, सुयश पांडुरंग श्रीखंडे - अपक्ष, अर्जुन सुखदेवराव युवनाते - अपक्ष, वासुदेव विठ्ठलराव कळसकर - अपक्ष, सुरज निरंजन लांडगे - आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

40 दर्यापूर विधानसभा मतदारसंघात बबन महादेव विल्हेकर – अपक्ष, रमेश झिंगुजी अंभोरे – अपक्ष, राक्षसकर निलेश गजानन – अपक्ष, मनोहर अमृतराव चौथमल – अपक्ष, गजानन मोतीराम लवटे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), नागोराव वामन हंबर्डे – बहुजन समाज पार्टी, मनोहर कृष्णाजी कुऱ्हाडे – अपक्ष, रमेश गणपतराव बुंदिले – राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी, श्रीराम श्रावण नेहर – अपक्ष, कैलास उत्तमराव मोरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ), रविकिरण देविदास तेलगोटे – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

41 मेळघाट विधानसभा मतदारसंघात राजेश किसन दहीकर – अपक्ष, विपीन छोगालाल पटेल – अपक्ष, केवलराम तुळशीराम काळे - भारतीय जनता पार्टी, रामचरण माणिकराव चव्हाण - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हेमंत नंदा चिमोटे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राजकुमार दयाराम पटेल - प्रहर जनशक्ती पार्टी, प्रवीण रामू मावसकर - अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

42 अचलपूर विधानसभा मतदारसंघात ठाकूर प्रमोदसिंह जियालाल गड्रेल – अपक्ष, तमीज शाहा उमर शाहा – अपक्ष, गिरीधर नथ्थूजी रौराळे – अपक्ष, अक्षरा रूपेश लहाने – अपक्ष, रवि गुणवंत वानखडे – बहुजन समाज पार्टी, गौरव ओमप्रकाश किटुकले – अपक्ष, बच्चू कडू – प्रहर जनशक्ती पक्ष, रूकसाना सैय्यद निसार – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

43 मोर्शी विधानसभा मतदारसंघात उमेश प्रल्हादराव शहाणे – अपक्ष, देवेंद्र महादेवराव भुयार – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, प्रमोद सुभाषराव कडू – अपक्ष, सुशिल सुरेशराव बेले – आझाद समाज पार्टी (कांशीराम), गिरीश रंगराव कराळे - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (श. प.), कमलनारायण जानराव उईके – बहुजन समाज पार्टी, महेंद्र उत्तमराव भातकुले – अपक्ष, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...