पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले
श्री अंबादेवी, श्री एकविरा देवीचे दर्शन
अमरावती, दि. 7 :
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीचे दर्शन
घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने श्री. पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार
करण्यात आला. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, संस्थानचे विश्वस्त
विलास मराठे ,मीनाताई पाठक, कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे , सचिव ॲड. दीपक श्रीमाळी,अशोक
खंडेलवाल, शैलेश पोद्दार , राजेंद्र पांडे आदी उपस्थित होते.
00000
अमरावती आयटीआयचे नामकरण
पालकमंत्र्यांच्या हस्ते
कोनशिलेचे अनावरण
अमरावती, दि. 7 : अमरावती शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेचे संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण
करण्यात आले आहे. यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते
कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन आणि दीक्षांत
समारंभ घेण्यात आला.
यावेळी प्रविण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ
कटियार, सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक रवींद्र लोखंडे, उपसंचालक संजय बोरकर,
चेतन पवार आदी उपस्थित होते.
दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात आदित्य
राठोड, संकल्प इंगळे, सूरज तायडे, प्रथमेश केवले, सुमिरन कराळे या प्रथम आलेल्या
विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी, उद्योगात
सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी अद्ययावत ज्ञानाने
परिपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन उद्योगांना गरज असलेले मनुष्यबळ तयार
करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे. त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक
आहे. आयटीआयमध्ये येणारा तरुण हा प्रामुख्याने गरजू असतो. त्याच्या ज्ञानासोबत
त्याची आर्थिक सुबत्ता मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या
हाताला काम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे.
भारत
आज तरुणांचा देश आहे. आज इतर देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असताना आपल्या
देशाने मनुष्यबळ पुरवठा करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. आज जर्मनी देशात
मनुष्यबळाची आवश्यकता असून तेथे मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत
आहे. युवकांना जर्मन भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे.
भारत हा कौशल्य विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या संधी प्राप्त
करून घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
पल्लवी वैद्य यांनी सूत्रसंचालन
केले. संजय बोरकर यांनी आभार मानले.
000000
महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना
तयार करणार
-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
*महिला मेळाव्यात आर्थिक
साक्षरतेबाबत मार्गदर्शन
अमरावती, दि. 7 : घराच्या जबाबदारीने असंख्य
महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना
मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या
मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मुर्त रूप
येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
आज सायन्स स्कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी
लाडकी बहिण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत
जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी आमदार रवी राणा,
प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता
मोहपात्रा, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ.
उमेश टेकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा समन्वय अधिकारी
सुनील सोसे, निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्याला
राजमाता मॉ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर
यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या महिलांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले
आहे. महिलांचा विकास हा शासनाचा अग्रकम आहे. त्यासाठी शासन महिलांसाठी विविध योजना
राबवित आहे. या योजनांची माहिती महिलांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात
आले आहेत. याठिकाणी भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महिलांना
बळ देणारी आहे. महिलांचे अर्ज पात्र झाल्यापासून त्यांना लाभ देण्यात येत आहे. ही
योजना निरंतर सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात सहा लाखाहून अधिक लाभार्थी असलेली ही
योजना आहे. थेट बॅंक खात्यात ही रक्कम देण्यात येत असल्यामुळे कमी वेळात ही योजना
यशस्वी झाली आहे. यासोबत मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस
सिलिंडर, पिंक रिक्षा, बचतगटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन, तीर्थक्षेत्र आदी
असंख्य योजना महिला सशक्तीकरण करण्यासाठी राबविण्यात येत आहेत.
अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहिण योजना यशस्वी
केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांचे मानधन वाढविण्यात आले
आहे. तसेच लाडकी बहिण योजनेचा प्रोत्साहन भत्ताही लवकरच दिला जाईल. ग्रामपातळीवर
लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांनी
शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात लाडक्या बहिणी, उत्कृष्ट कामकाज
करणाऱ्या अंगणवाडी सेविका, नवतेजस्विनी उद्योजिका, महिला बाल विकास विभागातील
अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला बचतगटांना कर्ज वितरण धनादेश वाटप
करण्यात आले. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. डॉ. कैलास घोडके यांनी आभार
मानले.
00000
पालकमंत्र्यांच्या
हस्ते तंत्रनिकेतनमधील
उत्कृष्टता,
संगणक केंद्राचे उद्घाटन
अमरावती, दि. 7 : शासकीय तंत्र निकेतनमधील
उत्कृष्टता केंद्र आणि अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा
पाटील यांनी केले. यावेळी प्रविण पोटे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय
मानकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी, देशात नवीन
शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कौशल्यपूर्ण युवक तयार
करण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी भर देण्यात येत
आहे. जुन्या शैक्षणिक धोरणात उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य देण्यात येत
नसल्यामुळे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत होते. आता सुरवातीपासूनच रोजगारक्षम युवक
तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच युवकांना संगणकातील अत्याधुनिक शिक्षण
प्राप्त व्हावे यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि थ्री डी प्रिंटींग उत्कृष्टता केंद्र
सुरू करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तंत्रनिकेतनमध्ये
अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी संस्थांमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध
करून देण्यात येणार आहे. तसेच संशोधन केंद्रासाठी केंद्राने 272 कोटी रूपयांचा
निधी उपलब्ध करून दिला आहे.
अमरावती येथील तंत्रनिकेतनला अतिक्रमण
काढण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला आहे. तातडीने अतिक्रमण काढून संरक्षण
भिंत बांधण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
000000
शेतकऱ्यांनी
रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा
-पालकमंत्री
चंद्रकांतदादा पाटील
*उत्कृष्ट
रेशीम उत्पादकांचा सत्कार
अमरावती, दि. 7 : इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम
शेतीतून जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक
विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती
विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे
वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.
निलेश हेलोंडे पाटील, खासदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य
कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कापसापासून ते
तयार कपड्यापर्यंत साखळी निर्माण करण्यात येत आहे. बाजारपेठेतील विविध
फॅशन्सप्रमाणे रेशीम वस्त्रांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कापसा पेक्षा जास्त
उत्पन्न रेशीममधून मिळत आहे. रेशीमला असलेली मागणी आपण अद्यापही पूर्ण करू शकलो
नसल्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. रेशीम शेती वाढल्यास
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेशीम खरेदीची व्यवस्था करण्यात येईल. याच धर्तीवर
सोलापूर येथे केंद्र निर्माण करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, पाणी, खते,
मार्गदर्शन आणि उत्पादीत मालाला भाव मिळाल्यास शेतकरी स्वयंपूर्ण होईल. त्याला
शासनाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे
राहण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकरीही रेशीम शेती
करू शकतो. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन
त्यांनी यावेळी केले.
000000
अमरावती, दि. 07 : अनुसूचित जाती जमाती आयोगाचे
धर्मपाल मेश्राम उपाध्य यांचा मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर, रोजीचा अमरावती जिल्हा दौरा पुढील प्रमाणे :
मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी
10 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने
अमरावती कडे प्रयाण. दुपारी
1 वाजता अमरावती
येथे आगमन व विश्रामगृहाकडे रवाना.
दुपारी 1 ते
2 पर्यत राखीव. दुपारी
2 ते 3 पर्यंत सामाजिक विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजने बाबत
आढावा बैठक आढावा बैठकीस
प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अमरावती
व सहायक आयुक्त
समाज कल्याण यांची बैठकीस उपस्थित राहावे. तसेच समाज कल्याण विभागातील
शासकीय वसतिगृहाच्या अडचणीबाबत
गृहपाल यांचे सोबत चर्चा व वसतिगृहास
भेट गृहपाल यांनी सदर बैठकीस
उपस्थित राहावे. आदिवासी
विभागामार्फत विविध चिखलदरा,
यांनी बैठकीस उपस्थित
राहावे. दुपारी 4 वाजता अमरावती
येथून शासकीय वाहनाने
नागपूरकडे रवाना.
0000
No comments:
Post a Comment