Wednesday, October 2, 2024

DIO NEWS AMRAVATI 1.10.2024

 




राष्ट्रपिता महात्मा गांधी,लाल बहाद्दुर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

      अमरावती, दि.2 (जिमाका): राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहाद्दुर शास्त्री यांची जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधीक्षक निलेश खटके यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

     विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनीही यावेळी महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांना अभिवादन केले.

 

000000

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा आज जिल्हा दौरा

 

अमरावती, दि. 02 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन गुरूवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

 

त्यांच्या दौऱ्यानुसार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गुरूवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 3.45 वाजता अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत विविध घटकांशी भेटी घेऊन चर्चा करतील. त्यांचा गुरूवारी अमरावती येथे मुक्काम राहणार आहे.

 

शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.10 वाजता विश्रामृगह येथून बेलोरा विमानतळ हेलीपॅडकडे प्रयाण करतील. त्यानंतर सकाळी 9.40 वाजता बेलोरा विमानतळ येथून शासकीय हेलीकॉप्टरने बुलडाणाकडे प्रयाण करतील.

00000








 

महात्मा गांधींचा जीवनप्रवास उलगडणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन

-     जिल्हाधिकारी सौरभ कटियार

नागरीकांनी व विद्यार्थ्यांनी मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

 

श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ४ ऑक्टोंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

नागरीकांसाठी निःशुल्क प्रवेश

 

अमरावती, दि. 2 : महात्मा गांधी यांचा जीवनप्रवास उलगडणारे उत्कृष्ठ दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन असून नागरीक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला आर्वजुन भेट देऊन माहिती जाणून घ्यावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

 

महात्मा गांधी जयंती निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती, जिल्हा प्रशासन अमरावती, जिल्हा परिषद अमरावती, महानगरपालिका अमरावती, पोलिस अधिक्षक कार्यालय अमरावती, महिला व बालविकास विभाग, जि. प. अमरावती, जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्शी मार्गावरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महात्मा गांधीचा जीवनप्रवास या विषयावर आधारित मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सभागृहात आयोजित केलेल्या मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन उदघाटन समारंभ व अंगणवाडी सेविका, मदतनीस व  पर्यवेक्षिका यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

 

            याप्रसंगी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महानगर पालिका आयुक्त सचिन कलंत्रे, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुध्दभूषण सोनवणे, बालविकास प्रकल्प अधिकारी सर्वश्री विलास दुर्गे, अतुल भडांगे, नारायण तेरे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी कटियार पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहितीचे उत्कृष्ठ संकलन करून छायाचित्र व माहितीच्या स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. एखादे पुस्तक वाचल्यावरच गांधीजींची माहिती आपल्याला कळते. मात्र प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या संपुर्ण जीवन प्रवासाची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरीकांनी प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत उत्कृष्ठ अशी प्रदर्शनी लावण्यात आली असून नवीन पिढी व विद्यार्थ्यांसाठी अमुल्य अशी माहिती आहे. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

            महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे म्हणाले, महात्मा गांधी यांचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणादायी आहे. या प्रदर्शनात त्यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या विविध घटनाक्रमांची माहिती मांडण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. त्यामुळे प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत व महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी केले. संचालन शिप्रा मानकर, आभार प्रदर्शन बालविकास प्रकल्प अधिकारी नवनाथ घनतोडे यांनी केले. कार्यटक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी शशिकांत पटेल, एमटीएस सागर लाडोळे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. 

 

अंगणवाडीसेविका, मदतनीस व  पर्यवेक्षिका यांचा सत्कार

 

यावेळी कार्यक्रमात पोषण माह मध्ये उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल उत्कृष्ठ कार्य करणा-या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग मार्फत सत्कार करण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महानगर पालिका आयुक्त सचिन कलंत्रे हस्ते महिला व बालविकास विभागाच्या खालील युनीटचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

1.अमरावती

2.अंजनगाव सूर्जी

3. अचलपूर

4.भातकुली

5. धारणी

6. चिखलदरा

7.चांदुर बाजार

8.नांदगाव खंडेश्वर

9. चांदुर रेल्वे

10.तिवसा

11.धामणगाव

12. मोर्शी

13. वरूड

14. दर्यापूर

15.नागरी पशिम

16.नागरी उत्तर

17.नागरी दक्षिण

18.नागरी पूर्व

 

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...