Tuesday, October 29, 2024

DIO NEWS AMRAVATI 29.10.2024

 

विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक जिल्ह्यात दाखल

*चार सामान्य निरीक्षक, दोन खर्च निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक

अमरावती, दि. 29 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नेमणूक केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी चार सामान्य निरीक्षक, दोन खर्च निरीक्षक आणि एक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीतील तक्रारींच्या अनुषंगाने 36 धामणगाव रेल्वे, 37 बडनेरा या मतदारसंघासाठी रवी रंजन कुमार विक्रम, संपर्क क्रमांक 9021798055, 38 अमरावती आणि 39 तिवसा मतदारसंघासाठी श्याम लाल पुनिया, संपर्क क्रमांक 9172760284, 40 दर्यापूर मतदारसंघासाठी लक्ष्मीशा जी, संपर्क क्रमांक 9226465559, 42 अचलपूर आणि 43 मोर्शी मतदारसंघासाठी बिधान चंद्र चौधरी, संपर्क क्रमांक 9021796356 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खर्च निरीक्षक म्हणून धामणगाव, बडनेरा, अमरावती आणि । तिवसासाठी वेंकान्ना तेजावथ, संपर्क क्रमांक 7666243468 आणि दर्यापूर, मेळघाट, अचलपूर, मोर्शी या मतदारसंघासाठी उमा माहेश्वरी 7666791114 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून बत्तुला गंगाधर, संपर्क क्रमांक 7276027550 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तक्रारीचे निराकरण करण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात नागरिकांना तक्रारी, समस्या असल्यास संबंधित निरीक्षकांकडे मांडता येणार आहे.

000000









उत्सव लोकशाहीचा सन्मान मतदारांचा दिपोत्सव एक दिवा मतदारांच्या सन्मानासाठी

अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्हा स्वीप कक्ष जि.प.अमरावती, महीला आर्थिक विकास महामंडळ व महीला व बाल विकास कार्यालय अमरावती तर्फे सोमवार दिनांक 28ऑक्टोबरला अमरावती येथे दीपोत्सव व मतदान जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी नोडल अधिकारी(SVEEP) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महोपात्रा यांचे शुभ हस्ते दिवा लावून उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक माविम सुनील सोसे, विलास मरसाळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाडे, शिक्षणाधिकारी तथा महिला व बालविकास अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, युवा प्रशिक्षणार्थी, माविम तालुका संघटक, स्वीप टीमचे ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, नितीन माहोरे, हेमंतकुमार यावले, राजेश सावरकर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी दीप प्रज्जवलित करुन फटाक्यांच्या आतिश बाजित दीपोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांना जिल्हा नोडल अधिकारी संजीता महोपात्रा यांनी दिवाळी सणा निमित्य शुभेच्छा देऊन मतदान जनजागृती करण्याबाबत आवाहन केले.

0000

तिवसा विधासभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक अमरावतीत दाखल

        अमरावती, दि. 29 (जिमाका): विधासभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने 38-अमरावती विधानसभा मतदार संघ व 39-तिवसा विधासभा मतदार संघासाठी मुळचे राजस्थान व दिल्ली येथे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले श्याम लाल पुनिया  हे निवडणूक निरीक्षक म्हणून आज अमरावतीत दाखल झालेले आहे.

            श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक यांच्या मुक्काम आज दि. 29 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत मुख्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे राहील. 038-अमरावती विधासभा मतदार संघ व 039-तिवसा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत त्यांची नियुक्ती केलेली असून सामान्य नागरिकांच्या निवडणूक विषयक काही तक्रार किंवा सूचना असतील तर श्याम लाल पुनिया, निवडणूक निरीक्षक यांच्याशी सकाळी 10 ते 11 वेळेत पूर्णा कक्ष, मुख्य शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे संपर्क साधता येईल. त्यांचा वैयक्तिक संपर्क क्रमांक 7085481617 व स्थानिक संपर्क क्रमांक 9317283159 असा राहील. तसेच त्यांचे मेल आयडी shyamlal.poonja@ias.nic.in यावरही सामान्य नागरिकांना आपल्या निवडणूक विषयक काही तक्रारी किंवा सूचनाअसल्यास सादर करता येईल, अशी माहिती 38-अमरावती विधासभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, अमरावतीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

00000

शिष्यवृत्तीचे अर्ज  तातडीने निकाली काढण्याचे आवाहन

 

अमरावती, दि.29 (जिमाका) : सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित 

जाती प्रवर्गातील विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण की परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी महाडीबीटी पोर्टलवरून नवीन व नुतनीकरणाच्या अर्जांची ऑनलाईन स्वीकृती सुरू करण्यात आलेली आहे.

संबंधित महाविद्यालयांनी दि. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. दि. 15 नोव्हेंबर नंतर कुठल्याही महाविद्यालयाचा प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाही.

 

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठवावे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉगिनकडे त्रुटी पूर्ततेसाठी परत केलेले अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून त्वरित त्रुटिपूर्तता करून पात्र अर्ज जिल्हा लॉगिन वर पाठविण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र व्ही. जाधवर यांनी केले आहे.

0000

निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत

            अमरावती, दि. 29 (जिमाका) : कोषागारामधून निवृत्तीवेतन स्वीकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर राज्य निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, माहे नोव्हेंबर महिन्यात संबंधित बँक शाखेत निवृत्तीवेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या पेंशन संबंधित बँक शाखेत जाऊन कोषागार कार्यालयाकडून प्राप्त असलेल्या बँकेच्या निवृत्तीवेतनधारकांच्या हयात यादीवरच स्वाक्षरी करावी तसेच विहित नमुन्यात संपूर्ण माहिती भरावी. बँकेत जातांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जावे. निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 चे निवृत्ती वेतन काढता येणार नाही. याबाबत निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाचे कोषागार अधिकारी अमोल ईखे  यांनी केले आहे.

0000



मेळघाटातील स्वयंसेवी संस्थांसोबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद

अमरावती, दि. 29 (जिमाका): मेळघाट विकास समन्वय समिती, आरोग्य सेवा अमरावती व महिला बाल कल्याण विभाग यांच्या सोबत माता मृत्यू व बाल मृत्यू या विषयावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी संवाद साधून आवश्यक उपाययोजनेबाबत चर्चा केली. धारणी तालुक्यातील कुसुमकोट खु. येथे उपस्थित डॉ. आरती कुलवाल, डॉ. सुरेश असोले, सहा प्रकल्प अधिकारी धारणी श्री. ठोंबरे, जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. रमेश बनसोड, डॉ. तिलोत्तमा वानखडे, वनिता शिंदे, श्री. पिंजरकर यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विभागासह एनजीओ व आयसीडीएस विभाग तसेच गावातील नागरिकांचा सहभाग यात महत्त्वपूर्ण आहे.यामुळे माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ज्या गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही, पावसाळयात गावांचा संपर्क तुटतो, रोजगार उपलब्ध नसल्यामुळे लोकांचे स्थलांतराचे प्रमाण मोठया प्रमाणात आहेत, भुमका पडीयार अंधश्रध्दा यांच्यावर लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे, कमी वयात लग्नाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने कुपोषित बालके आहेत त्याकरिता उपाययोजना करण्यात यावी.

जेथे संतती प्रतिबंधात्मक वापरचे प्रमाण कमी आहे, दोन अपत्यामधील अंतरचे प्रमाण कमी आहे, मातामध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त आहे, गरोदर माता व स्तनदा माता नियमित आयर्न फॉलिक गोळयांचे सेवन करीत नाही अशा ठिकाणी अति दुर्गम भागात आरोग्य सहायक, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांची भूमिका महत्त्वाची आहे. घरी होणा-या प्रसुती तसेच दुर्गम आदिवासी भागात लोक संदर्भ सेवा घेण्यासाठी तयार होत नाही, यासाठी ग्रामसेवक, सरपंच व तलाठी यांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. गावातील उकरडे, गटारे, नळदुरुस्तीसाठी आरोग्य सेवक वगळता ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालय उपाययोजना करण्यात याव्यात. मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण या बाबींवर तसेच या अनुषंगाने विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

0000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...