Friday, February 16, 2024

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

 

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

             अमरावती, दि. 16 (जिमाका) : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर महिन्यात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

          जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी तसेच विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

62 रिक्तपदांसाठी राबविणर भरती प्रक्रिया

             या मेळाव्यामध्ये 62 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये श्याम इंडोफॅब प्रा. लि. नांदगावपेठ अमरावती येथे असोसीएट ट्रेनी(पुरूष) 5 पदे, असिस्टंट मॅनेजर (स्त्री/पुरूष) 3, एक्झीकेटीव्ह(पुरूष) 2 पदे. बायजु ट्यूशन क्लासेस अमरावती येथे बिझनेस डेव्हलोपमेंट एक्झीकेटीव्हचे(स्त्री/पुरूष) 10 पदे, पि.पि.एस. एनर्जी सोल्युशन प्रा. लि. अमरावती येथे  ट्रेनी ज्युनिअर इंजिनिअर(पुरूष) 5 पदे. स्टारलाईट फायनांसियल सर्विसेस प्रा. लि. अमरावती येथे सेल्स एक्झीकेटीव्ह (पुरूष) 10, टेलीकॉलर (स्त्री/ पुरूष) 20, टीम लिडर(स्त्री/पुरूष) 1 पद. सनशाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, अमरावती येथे रिसेप्शनिस्ट(स्त्री) 2 पदे व ओ.टी. टेक्नीशीअन(स्त्री/ पुरूष) 4 पदे अशा एकूण 62 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

 

          या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://shorturl./uGQTZ या लिंकवर  जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. अथवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे. जॉब सिकर(Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. जॉब सिकर लॉगीन हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन लॉगीन व्हावे. त्यांनतर पंडीत दीनदयाल उपाध्याय जॉब्‍ फेअर हा पर्याय निवडावा. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते. त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -10, दि. 21/2/2024 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर व्हॅकेन्सी लीस्ट या टॅबवर क्लिक करावे. ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील. त्यानंतर अप्लाय बटणावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा मॅसेज दिसेल.

        अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच 21 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, बस स्टँड रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...