Wednesday, February 28, 2024

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि. 28 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी कार्यक्षेत्राअंतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत रेडीमेट होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनाचा लाभ घेण्याकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक आदिवासी पुरूष, महिला समुह, बचत गट यांनी  अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

 

            केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 चा लाभ घेण्याकरीता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून नि:शुल्क अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनाचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर, तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी या ठिकाणी व नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त आदिवासी विकास येथे तसेच मोर्शी, वरूड, तिवसा व चांदुर बाजार तालुक्यातील लाभार्थांकरीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत उपकार्यालय मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेक. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील विकास शाखेशी तसेच दूरध्वनी क्र. 07226-224217 वर संपर्क साधावा. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि. 29 फेब्रुवारी असून यांची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. गट-अ आदिवासी पुरूष, महिला समुह, बचत गट यांनी रेडीमेट होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनेकरीता शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र, अपात्र अर्ज दाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करतांना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्य, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल.

00000

 

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...