Monday, February 12, 2024

राष्ट्रीय लोक अदालत 3 मार्चला

 

राष्ट्रीय लोक अदालत 3 मार्चला

अमरावती, दि.12 (जिमाका):  अमरावतीसह राज्यातील सर्व न्यायालयात रविवार, दि. 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दाखल व दाखलपूर्व असे प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिक तसेच पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालती समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले राष्ट्रीय लोक अदालत समक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाव्दारे करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-02-2026

                                                         हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान *प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव ...