Friday, February 16, 2024

मासिक पाळी स्वच्छता पॅड निर्मिती प्रशिक्षण योजनेंतर्गत स्वंयसेवी संस्थेकडून 20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले

 

मासिक पाळी स्वच्छता पॅड निर्मिती प्रशिक्षण योजनेंतर्गत स्वंयसेवी संस्थेकडून 20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले

अमरावती, दि. 16 (जिमाका): नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत सन 2023-24 मध्ये मासीक पाळी स्वच्छता पॅड निर्मिती व जागरुकता प्रशिक्षण योजना स्वंयसेवी संस्थामार्फत राबविण्यात येणार आहे. याकरीता इच्छुक स्वंयसेवी संस्थानी आवश्यक कागदपत्रासह मंगळवार दि. 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणीचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी कार्यक्षेत्रांतील नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत मासीक पाळी स्वच्छता पॅड निर्मिती व जागरूकता प्रशिक्षणांतर्गत स्वयंसेवी संस्थाचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी जि. अमरावती येथे विहित मुदतीत सादर करावा. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 07226-224217 वर संपर्क साधावा.

           स्वयंसेवी संस्थाकडे प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक राहिल. संस्थाकडे सर्व प्रकारच्या मशीनरी उपलब्ध असाव्या. तसेच साहित्याचे उत्पादन होणे क्रमप्राप्त आहे. स्वंयसेवी संस्थाने प्रशिक्षण दिलेल्या महिलांकडून उत्पादीत झालेले उत्पादन खरेदी करणे बंधनकारक राहील. शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छानणी करून प्रकल्प स्तरावरील खरेदी समिती अंतिम निर्णय घेईल. त्यानंतरच प्रस्तावातुन स्वंयसेवी संस्थाची निवड करण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्राव्दारे कळविण्यात आली आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-02-2026

                                                         हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान *प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव ...