Monday, February 19, 2024

अमरावतीच्या सोहम ठाकरे याच्या जादुई आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

 


अमरावतीच्या सोहम ठाकरे याच्या जादुई आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध

 

अमरावती, दि.19 (जिमाका): स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला केला आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गर्जा महाराष्ट्र या संगीतमय मैफिलीत बायो मराठी या वाहिनीवरील छोटे उस्ताद,मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात सहभागी झालेला अमरावती येथील दहा वर्षीय बाल गायक सोहम ठाकरे याने गायिलेल्या मोरया मोरया या गीताने अमरावतीकर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. सोहम ठाकरे याच्या जादुई आवाजाने महाराष्ट्राला भुरळ घातली मात्र अमरावतीकरांनी वन्स मोर म्हणत सोहमच्या जादुई आवाजाचा पुन्हा आनंद घेतला.

0000

 

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार