Tuesday, October 22, 2024

DIO NEWS AMRAVATI 22.10.2024

 





विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक दाखल

*जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षांना भेटी

*खर्चाच्या समितीकडून आढावा

अमरावती, दि. 22 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक अमरावती येथे दाखल झाले आहे. व्यंकन्ना तेजावत आणि श्रीमती उमा माहेश्वरी यांचे आज अमरावती आगमन झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च समितीच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, खर्च समितीचे नोडल अधिकारी विजय देशमुख आदी उपस्थित होते. खर्च निरीक्षक व्यंकन्ना तेजावत यांच्याकडे 36 - धामणगाव रेल्वे, 37 - बडनेरा, 38- अमरावती, 39 – तिवसा आणि श्रीमती उमा माहेश्वरी यांच्याकडे 40 – दर्यापूर, 41 – मेळघाट, 42 – अचलपूर, 43 – मोर्शी या मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

श्री. तेजावत यांनी खर्च समितीकडून जिल्ह्याचा आढावा घेतला. प्रामुख्याने ज्या बाबींवर उमेदवारांकडून आक्षेप नोंदविला जातो, अशा बाबींचा खर्च नोंद करताना काळजी घेण्यात यावी. तसेच उमेदवारांच्या रॅली, प्रचारसभा यांच्यावर होणारा खर्च नोंदविताना खबरदारी घ्यावी. याबाबत आक्षेप येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्हा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती दिली. निवडणुकीसाठी फिरते पथक, स्थिर पथक, व्हीडीओ पथक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून ही सर्व पथके कार्यान्वित झाली आहे. पथकात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचारी-अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती दिली.

000000

शहर वाहतुकीत दि. 29 ऑक्टोबर रोजी तात्पुरता बदल;

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

            अमरावती, दि.22 (जिमाका) : बडनेरा-37 विधानसभा मतदार संघातील उमेदवार यांना नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. बडनेरा-37 विधानसभा मतदार संघाचे नामांकन अर्ज जुने तहसिल कार्यालय, मुख्य पोस्ट ऑफीस जवळ, अमरावती या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहे. या कार्यालया समोरील मार्ग अत्यंत गजबजलेला असतो. ही बाब लक्षात घेता या दिवशी शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिली आहे.

तात्पुरत्या अधिसूचनेनुसार यादिवशी मुख्य पोस्ट ऑफीस, अमरावती ते तहसील कार्यालयाच्या भिंती पावेतो  येणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

           पर्यायी मार्ग याप्रमाणे : वाहन चालकांनी श्याम चौक ते साबनपुरा व बापट चौक ते जवाहर गेटकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करतील.

            मुख्य पोस्ट ऑफीस, अमरावती ते तहसील कार्यालय या मार्गावरील आस्थापनाधारकांनी आपली वाहने सकाळी 10 वाजेपूर्वी आस्थापनाकरीता आरक्षित पार्कींगमध्ये ठेवावी. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान प्रवेश बंदी असलेल्या मार्गावरून आपणास वाहन ने-आण करता येणार नाही. या कालावधीत आपणास वाहनाचे काम असल्यास आपण प्रतिबंधित मार्गाच्या बाहेर आपली वाहने अन्य सुरक्षित ठिकाणी पार्क करावी.

या अधिसूचनांचे जो कोणी वाहनचालक उल्लंघन करेल, त्यांचेविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे कायेदशीर कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...