Tuesday, November 12, 2024

DIO NEWS AMRAVATI 12.11.2024

 

दर्यापूर विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी

*सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च

अमरावती, दि. 12 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी सोमवार, दि. 11 नोव्हेंबर रोजी नवीन तहसिल इमारतीमध्ये पार पडली. यावेळी सर्व 16 उमेदवारांनी खर्च सादर केला.

दुसरी तपासणी खर्च निरीक्षक डॉ. उमा माहेश्वरी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.  लेख्यांच्या तपासणीवेळी एकूण 16 उमेदवारांपैकी 16 उमेदवार उपस्थित राहिले. सदर खर्च तपासणीवेळी खर्च नोंदवहीत नोंदविलेला खर्च व खर्च सनियंत्रणन पथकाव्दारे नोंदविण्यात आलेला खर्च यात असलेली तफावत उमेवारांनी मान्य करून उमेदवारांच्या खर्च लेख्याचा ताळमेळ घेण्यात आला. उमेदवारांच्या लेख्याची तिसरी तपासणी दि. 15 नोव्हेंबर रोजी नविन तहसिल इमारत दर्यापूर येथील सभागृहात होणार आहे.

00000





                                                     नशामुक्त तरुणाई जागरूकता कार्यक्रम

अमरावती, दि. 12 (जिमाका) : नेहरु युवा केंद्रातर्फे धामणगांव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात नशामुक्त तरुणाई, जागरूकता आणि शिक्षण कार्यक्रम पार पडला.

प्राचार्य डॉ. सुधीर बायस्कर अध्यक्षस्थानी होते. डॉ. मुकुंदराव पवार स्कूलच्या वसतिगृहाचे अधीक्षक ग्रामगिताचार्य हनुमंतदादा ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिपक शृंगारे यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाला डॉ. संजय पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण केचे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. पूनम गहूकर, प्रा. विलास नागोसे, प्रा. विशाल मोकाशे, प्रा. समीक्षा वानखडे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वैष्णवी राठोड, सुवर्णा वंजारी, मैथिली वैद्य, स्नेहल पतालिया, विद्या बोबडे, महेंद्र काळे, भूमेश्वरी ठोंबरे यांनी पुढाकार घेतला. तानिया टेकाम हिने सूत्रसंचालन केले. प्रा. विशाल मोकाशे यांनी आभार मानले.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...