Sunday, November 10, 2024

DIO NEWS AMRAVATI 10.11.2024

 

अमरावती विधानसभा क्षेत्रात तीन उमेदवारांना नोटीस

*खर्च सादर करण्याचे निर्देश

अमरावती, दि. 10 (जिमाका) : अमरावती विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशित उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी गुरूवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी पार पडली. यात खर्च सादर केलेला नाही, अशा तीन उमेदवारांना नोटीस देऊन 48 तासाच्या आत खर्च सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून वेंकन्ना तेजावथ यांची नियुक्ती केली आहे. लेख्यांच्या पहिल्या तपासणीवेळी एकूण 22 उमेदवारांपैकी 4 उमेदवार अनुपस्थित राहिले. अनुपस्थित उमेदवारांना 48 तासांत निवडणूक खर्चाचे लेखे उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील पहिल्या माळ्यावरील सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनासमोर, अमरावती येथे सादर करण्याबाबत नोटीस देण्यात आली. विहित मुदतीत खर्च सादर केला नसल्यास नियमानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.

18 उमेदवारांनी पहिल्या तपासणीवेळी त्यांचा दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला. 4 उमेदवारांनी खर्च सादर केला नसल्यास शॅडो खर्चानुसार खर्च नोंदविण्यात येणार आहे. पहिल्या तपासणीअंती उमेदवारनिहाय खर्च हा तात्पुरत्या स्वरुपाचा असून निकालानंतर आयोजित लेखा ताळमेळ बैठकीमध्ये ताळमेळ घेऊन सदर खर्चास अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. अंतिम बैठकीनंतर खर्चाचा ताळमेळ झाल्यानंतरच सदरचा खर्च हा भारत निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार भटकर यांनी कळविले आहे.

00000



दिव्यांग मतदारांना ईव्हीएमचे प्रात्यक्षिक

            अमरावती, दि. 10 (जिमाका) : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. त्यानुषंगाने ईव्हीएम मशीनवर मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी शनिवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी दिव्यांग मतदारांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनवर मतदानाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

अमरावती  विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी तहसिल कार्यालयात दिव्यांग मतदारांसाठी प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनवर प्रात्यक्षिक दिले. दिव्यांग मतदारांना ईव्हीएम मशीनवर मतदान करताना समस्या येऊ नये आणि मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी ही विशेष कार्यशाळा फक्त दिव्यांग मतदारांसाठी आयोजित करण्यात आली. यात दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला.

यावेळी दिव्यांग मतदारांचे जिल्हा सहायक नोडल अधिकारी पंकज मुदगल, द्विभाषिक म्हणून निरज तिवारी यांनी प्रात्यक्षिक देण्याची जबाबदारी पार पाडली. कार्यशाळेला तहसिलदार विजय लोखंडे उपस्थित होते. कार्यशाळेसाठी नायब तहसिलदार निवडणूक राजू दंडाळे, निवडणूक विभागाचे भारत कांबळे, पवन बोंडे यांनी पुढाकार घेतला.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12.11.2024

  दर्यापूर विधानसभा क्षेत्राची दुसरी खर्च तपासणी *सर्व उमेदवारांनी सादर केला खर्च अमरावती, दि. 12 (जिमाका) : दर्यापूर विधानसभा मतदारसंघा...