Friday, July 19, 2024

अटल भूजल योजना; मोर्शी येथे जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा संपन्न

 

अटल भूजल योजना; मोर्शी येथे जिल्हास्तरीय सरपंच कार्यशाळा संपन्न

          अमरावती, दि. 19 (जिमाका):   केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजने अंतर्गत माहिती शिक्षण व संवाद घटकाअंतर्गत "पाण्याचा पुरवठा व मागणी आधारित उपाययोजनांचा परिचय व देखभाल दुरुस्ती"  या विषयावर एकदिवसीय सरपंच यांची कार्यशाळा दि. 16 जुलै 2024 रोजी तहसील कार्यालय सभागृह मोर्शी येथे संपन्न झाली. यावेळी विषय तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.

       वरिष्ठ भूवैज्ञानिक भूसवियं राजेश सावळे यांचे मार्गदर्शनाखाली सरपंच यांची कार्यशाळा घेण्यात आली. जल पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर 2022 मध्ये भूजल समृध्द ग्राम स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त जरुड सरपंच सुधाकर मानकर, दुसरे पारितोषिक प्राप्त ग्राम पंचायत झटामझरी येथील सरपंच हिरकांत उईके, तिसरे पारितोषिक प्राप्त ग्रामपंचायत अंबाडा येथील सरपंच  रुपालीताई कडू यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सन 2023-24 च्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत 67 ग्रामपंचायतने सहभाग घेतला असून तपासणी 15 ऑगस्ट पर्यंत होणार असल्याची माहिती देण्यात आली. 

            कार्यक्रमाची प्रस्तावना व भूजल विषयक माहिती खुली करण्याच्या विविध पद्धती या विषयावर प्रमोद झगेकर यांनी माहिती सादर केली. त्यानंतर पाऊस व भूजल पातळीचे मोजमाप व नोंदी घेणे,  गरज व महत्व व संयत्राची तोंडओळख या विषयावर हरीश कठारे यांनी सादरीकरण केले. प्रात्यक्षिक व भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा या विषयावर दिनेश खडसे यांनी सादरीकरण केले. त्यानंतर पंचायतराज यशदाचे प्रवीण प्रशिक्षक यांनी अटल भूजल योजना व गाव कसे असावे व गावांमध्ये कोणत्या उपाय योजना राबविण्यात याव्या, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे सुत्र संचालन प्रमोद झगेकर यांनी केले. त्या नंतर मोर्शी येथील तहसिलदार विनोद वानखडे यांनी पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायतचे अभिनंदन केले.

यावेळी तहसिलदार मोर्शी विनोद वानखडे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष अमरावतीचे प्रमोद झगेकर, कृषी तज्ञ दिनेश खडसे, जल संधारण तज्ञ सचिन चव्हाण,  संगणक चालक पंकज कोठाळे, यांचे सह अटल भूजल योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतचे सर्व सरपंच, उपसरपंच तसेच डी.आय.पी. अश्वमेध आणि सारडा संस्थेचे समन्वयक, विषय तज्ञ व समूह संघटक उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...