एक रुपयात पीक विमा योजना; शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ
घ्यावा
अमरावती,
दि. 08 (जिमाका): नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा
याकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येतो. योजनेंतर्गत
खरीप हंगामासाठी एक रुपया भरुन पिक विमा संरक्षण प्राप्त होतो. तरी जिल्ह्यातील सर्व
शेतकरी बांधवानी एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ दि. 15 जुलैपूर्वी घ्यावा, असे
आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केल आहे.
हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून पीक
काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रीवादळ, पूर,
क्षेत्र जलमय होणे, भूस्खन, दुष्काळ, पावसातील खंड, किंड व रोग इत्यादी बाबीं मुळे
उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक
कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान इत्यादी जोखमीच्या बाबीचा योजनेत समावेश
करण्यात आला आहे. योजनेतंर्गत विमा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात पीक विमा योजनेंतर्गत
नोंदणी संथ गतीने सुरू असून आतापर्यत चालु हंगामात 93 हजार 569 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला
आहे. विमा नोंदणी करण्याची मुदत 15 जुलै असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. योजनेची सविस्तर
माहितीसाठी गावातील कृषी सहायक व तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. सी.एस.सी.
केंद्रामार्फत योजनेच्या अर्जामागे शेतकऱ्यांनी केवळ 1 रूपयाच भरावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी
अतिरिक्त पैसे घेतल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभाग, तहसिल कार्यालयास तक्रार करावी. अखेरच्या
दिवसात पीक विमा पोर्टलवर लोड येण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. तरी शेवटच्या दिवसाची
वाट न पाहता जवळच्या सी.एस.सी केंद्राशी संपर्क साधुन योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन
करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment