वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते रोगनिदान व उपचार शिबिराचे उद्घाटन; रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
अमरावती, दि. 04 (जिमाका): नादंगाव खंडेश्वर
तालुक्यातील पापळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन
करण्यात आले. या शिबिराचे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे
पाटील(राज्यमंत्री दर्जा) यांनी फित कापून उद्घाटन केले. शिबिराच्या माध्यमातून ग्रामिण
भागातील गरीब, गरजू लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून या शिबिराचा ग्रामस्थांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. हेलोंडे पाटील यांनी केले.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख
माजी कृषी मंत्री यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कै. वसंतराव नाईक शेती
स्वावलंबन मिशन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तहसिलदार पुरषोत्तम भुसारी,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे, समाज कार्य महाविद्यालयाचे प्रा. दीपक
काळे, पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक लांडगे तसेच पापळ
ग्रामपंचायतचे सरपंच अनिता वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र व राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी
विविध प्रकारच्या योजना राबवितात. शिबिराच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत
पोहोचाव्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक आरोग्य सोयीसुविधा व मनुष्यबळ
उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करुन प्राथमिक केंद्र बळकट करण्यासाठी
प्रयत्न करु, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे
पाटील यांनी केले. तत्पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागाला भेट देऊन तेथील
सोयीसुविधा, औषधांचा साठा, रुग्णांची स्थिती, मनुष्यबळ आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी
शिबिंराचा लाभ घेतलेल्या रुग्णांशी संवाद साधून मिळत असलेल्या सोयीसुविधेबाबत आस्थेने
विचारपूस केली. रुग्णांना स्थानिक पातळीवर सर्व आवश्यक आरोग्य सुविधा प्राप्त होण्यासाठी
प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्यत महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. हेलोंडे यावेळी म्हणाले.
शिबिरात हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, त्वचारोग,
क्षयरोग, कुष्ठरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, रक्त तपासणी, सिकलसेल, क्षय रुग्णांच्या थुंकीचे
तपासणी, कर्करोग, लहान मुलांचे आजार इत्यादीवर निदान व उपचार करण्यात आले. या शिबिराचे
मोठ्या संख्येने रूग्णांनी रोगनिदान व उपचार घेतले. कार्यक्रमाचे प्रस्तावना प्राथमिक
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक लाडंगे यांनी तर संचालन आरोग्य सहायक आर.ई.
मेश्राम यानी केले.
00000
No comments:
Post a Comment