Friday, July 12, 2024

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; कार्यक्रमातंर्गत सर्व स्तरावर जनजागृती करा- सौरभ कटियार

 





जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;

कार्यक्रमातंर्गत सर्व स्तरावर जनजागृती करा- सौरभ कटियार

           अमरावती, दि. 12 (जिमाका) : एचआयव्ही तपासणी करताना ग्रामीण व शहरी भागातील अधिकाधिक लोकांचा सहभाग घ्यावा. 'हाय रिस्क' व्यक्तीची तपासणी करून आजुबाजूच्या गावातील, परिसरातील लोकांची तपासणीही करून घ्यावी. एड्स नियंत्रण कार्यक्रमातंर्गत सर्व स्तरावर जनजागृती करावी. यासाठी विविध माध्यमाचा वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिले.

        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता मोहपात्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत हेडाऊ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय साखरे तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांनाचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी एचआयव्ही बाधितांसाठी उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेतला. बीपीएल, अंत्योदय कार्ड, एसटी पास आदी आवश्यक सुविधा रुग्णांना तत्काळ उपलब्ध करावी. जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाने विशेष मोहिम राबवावी, असेही निर्देश यावेळी दिले. त्यानंतर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, मुख रोग नियंत्रण कार्यक्रम, वातावरणातील बदल व साथ रोग, स्त्री भ्रूण हत्या नियंत्रण कार्यक्रम, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम इत्यादीचा आढावा घेतला.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...