गुरुवारपासून
जिल्ह्यात महसूल सप्ताह; नागरिकांनी लाभ घ्यावा
अमरावती,
दि. 30 (जिमाका): 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून 7 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात महसूल सप्ताहा
राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये शासनाच्या विविध योजनाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना
दिल्या जाणार असून नागरिकांनी सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार
यांनी केले आहे.
गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा
करणे व महसूल सप्ताह शुभारंभ व 'मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजना", शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी "मुख्यमंत्री युवा कार्य
प्रशिक्षण योजना", शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना",
रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी "स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय", सोमवार दि. 5 ऑगस्ट
रोजी "सैनिक हो तुमच्यासाठी", मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी "एक हात मदतीचा
दिव्यांगांच्या कल्याणाचा" आणि बुधवार दि. 7 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत,
सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व
महसूल सप्ताह सांगता समारंभ होईल.
महसूल विभागाने जिल्हास्तरीय महसुली कामे
वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे,
मोजणी करणे, अपिल प्रकरणाची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आणि महसुली वसुलीचे उदिद्ष्ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा
सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता
दि. 1 ऑगस्ट हा दिवस "महसूल दिन" म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.
यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक 1
ते 7 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात 'महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहानिमित्त
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
तहसिलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment