राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण
कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू मुक्त आरोग्यदायी शाळा उपक्रम
अमरावती, दि. 09 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू
मुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा व तालुकास्तरावर तंबाखू मुक्त आरोग्यदायी शाळा उपक्रम
राबविण्यात येत आहे. उपक्रमातंर्गत शाळा व महाविद्यालयात विविध कार्यक्रम व कार्यशाळेच्या
माध्यमातून तज्ज्ञाव्दारे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तंबाखू मुक्त आरोग्यदायी शाळा उपक्रमातंर्गत
जिल्हास्तरीय कार्यशाळा नुकतीच ज्ञानमाता हायस्कूल अमरावती येथे पार पडली. या उपक्रमात
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग जिल्हा परिषद
यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, उपशिक्षांधिकारी निखील
मानकर, शिक्षण विस्तार अधिकारी गजला नाजली, ज्ञानमाता हायस्कूलच्या प्राचार्य प्रवीण
खांडेकर आदि उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण
कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. मंगेश गुजर, सलाम मुंबई फौन्डेशनचे समन्वयक पूजा
वाघमारे व त्यांचे प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची
सुरुवात 3 जुलैपासून झाली असून सर्व तालुका ठिकाणी दि. 13 जुलै 2024 पर्यंत कार्यशाळा
तालुका स्तरांवर घेण्यात येत आहे. तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, वरुड व मोर्शी
या ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत समुपदेशक व सलाम मुंबई फौन्डेशनचे
तज्ज्ञ प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या 9 निकषाचे
कशा पद्धतीने पूर्ण करावयाचे व त्याची नोंदणी कशी कराची याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन
तज्ज्ञामार्फत केले जात आहे. प्रशिक्षणामध्ये तंबाखू नियंत्रण कायदा 2003 बाबत माहिती
व मार्गदशनही दिल्या जात आहे.
0000
No comments:
Post a Comment