Thursday, July 4, 2024

‘आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र’ सुरू करण्यासाठी महाविद्यालयाना आवाहन

 

‘आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालयाना आवाहन

 

          अमरावती, दि. 04 (जिमाका): विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी स्वत:च्या महाविद्यालयात उपलब्ध व्हावी, या दृष्टिकोनातुन शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या योजना विविध महाविद्यालयामध्ये कार्यान्वित केल्या जाणार आहे. यासाठी लिंक तयार करण्यात आली असून इच्छुक महाविद्यालयांनी गूगल फॉर्म भरून आपल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रोच सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

           

            योजनेंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक महाविद्यालयात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक, युवतींना भविष्यातील कौशल्य अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. यासाठी केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्मनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रांना विविध टप्प्यामध्ये प्रति प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण शुल्क अदा केले जाते. इच्छुक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मनोदय आहे. यासाठी

 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeYeQH8Vr0z4Ye0R5MtICJwqXzUtF7HGIu5aIm33IXxeM46ng/viewform ही लिंक तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महाविद्यालयामध्ये या लिंक मधील माहिती संपूर्ण भरून आपली इच्छुकता दर्शविने गरजेचे आहे. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी हा गूगल फॉर्म भरून आपल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ,बस स्टॅन्ड रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष भेट द्यावी. किंवा वैभव तेटु(7020958231), पंकज कचरे(8605654025) यांचेशी संपर्क साधावा.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...