कडधान्य
खरेदीसाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करा
अमरावती,
दि. 25 (जिमाका) : आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेडमार्फत
मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबीन खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी
पोर्टल सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा
लाभ घेणेसाठी ई-समृध्दी पोर्टलवर नाव नोंदणी करुन आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री
करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहकारी पणन महासंघामार्फत
करण्यात येत आहे.
हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित
केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, उडिद व सोयाबिन खरेदी करण्यात
येणार आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचवावा व शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी ई-समृद्धी पोर्टल सुरु केले आहे. पोर्टलवर
नोंदणी करण्यासाठी https://esamridhi.in#/login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची
एमएसपी दराने विक्री करण्यासाठी पोर्टलवर खरेदी प्री-रजिस्ट्रेशन करावे. पोर्टलवर नोंदणी करतांना अडचणी आल्यास अथवा अधिक
माहितीतीसाठी जिल्हा पणन अधिकारी यांच्या भ्रमणध्वनी क्रं. 7391994693, तसेच कार्यालयाचे
प्रतिनिधी स्वप्नील ढोले 9960546415 यांच्या
क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment