संत
रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती,
दि. 31 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत
रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी विविध योजना
राबविण्यात येतात. चर्मकार समाजाचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळाव्दारे
सन 2024-25 या वर्षासाठी अनुदान व बीजभांडवल योजना तर केंद्र शासनामार्फत एनएसएफडीसी
योजना राबविण्यात येते. या योजनचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास
चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक डि.व्ही. भागवतकर यांनी
केले आहे.
50 टक्के अनुदान योजना : या योजनेमध्ये राष्ट्रीयकृत
बँकेमार्फत 50 हजार रूपयेपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये बँकेचे सहभाग
40 हजार रूपये व महामंडळाचे अनुदान 10 हजार रूपये असे मिळून 50 हजार रूपये कर्ज दिले
जाते.
बीज भांडवल योजना
: या योजनमध्ये
राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 5 लाख रूपयेपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये बँकेचे
कर्ज 75 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व महामंडळाचे अनुदान 10 हजार रूपये असे मिळून
5 लाख कर्ज दिले जाते.
केंद्र शासनाच्या
योजना : मुदती
कर्ज योजना, लघुऋण वित्त योजना, महीला समृध्दी योजना, महिला अधिकारीता योजनेमध्ये महामंडळाचे
अनुदान 50 हजार रूपये आहे. तसेच शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये अनुदान उपलब्ध नाही.
00000
No comments:
Post a Comment