क्षयरोग
मुक्त 42 ग्रामपंचायतीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार;
क्षयरोग
मुक्त ग्रामपंचायत होण्यासाठी प्रयत्न करा- सौरभ कटियार
अमरावती,
दि. 19 (जिमाका): क्षयरोग मुक्त भारत 2025 पर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन
विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतीसाठी
70 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली होती. त्यापैकी शासनाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये
पात्र झालेल्या 42 ग्रामपंचायतीना क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत घोषीत करण्यात आल्या आहे.
या ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसचिव यांचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते
नुकतेच येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथे
सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी इत्तर ग्रामपंचायतीने
प्रेरणा घेऊन ग्रामपंचायतीमध्ये विविध उपाययोजना राबवून क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत
होण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
2024
मध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त होण्याकरीता सरपंच, ग्रामसचिव व आशा
यांनी निकषाप्रमाणे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी
अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी दिले.
क्षयरोग मुक्त भारताचे उद्दीष्ट पूर्ण
करण्यासाठी गाव पातळीवरील आरोग्य संस्था, उपकेंद्र, हेल्थ वेलनेस सेंटरचे कर्मचारी
व अधिकारी व संबंधित ग्रामपंचायतीच्या पाठिब्यांने क्षयरोग दुरिकरणासाठी सातत्याने
प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील समाजाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्रीय क्षयरोग
विभाग, आरोग्य व कुटूंब कल्याण नवी दिल्ली यांचे सोबत पंचायतराज विभागाने सामंजस्य
करारावर स्वाक्षरी करुन क्षयरोग मुक्तीसाठी उपाययोजना राबवित आहे.
क्षयरोग
मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी सहा निकाष ठरवून देण्यात आली होती. ते याप्रमाणे : संशयीत
क्षयरुग्ण तपासणी संख्या 1 हजार लोक संख्येमध्ये 30 टक्के असणे, क्षयरुग्ण शोधण्याचे
प्रमाण प्रति 1 हजार लोकसंख्येमध्ये 1 टक्का,
क्षयरोगाचा उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण 85 टक्केपेक्षा जास्त, औषध संवेदनक्षमता
चाचणी प्रमाण किमान 60 टक्के, निक्षय पोषण
योजना शंभर टक्के व प्रधानमंत्री टीबी मुक्त
भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांना पोषण सहाय्य शंभर टक्के असावे.
क्षयरोग मुक्त ग्रामपंयातीसाठी 2023 वर्षासाठी 70 ग्रामपंचायतीची
निवड करण्यात आली होती. त्यापैकी 42 ग्रामपंचायत सहा निकषामध्ये पात्र ठरविण्यात आले.
निकषाची पुर्तता करण्याऱ्या ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सल्लागार जागतिक आरोग्य संघटना अकोला
विभाग यांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा पुतळा व प्रशस्तीपत्रक देवून
गौरव करण्यात आला. तसेच तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य
केंद्र यांना सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसचिव,
तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, तालुकास्तरीय एसटीएस व एसटीएलएस उपस्थित
होते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये टिबी मुक्त पंचायत उपक्रमाचे
निकष उपस्थितांना अवगत केले. तसेच कार्यक्रमाची रुपरेषा व माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी
यांनी विषद केली.
0000
No comments:
Post a Comment