Sunday, July 21, 2024

एक हजार लाडक्या बहिणीने घेतली मदत कक्षाची मदत!

 


एक हजार लाडक्या बहिणीने घेतली मदत कक्षाची मदत!

सकाळी 6:00 ते रात्री 12:00 वाजेपर्यंत मदतीसाठी बहिणीचे दूरध्वनी

- संजीता मोहोपात्रा

 

            अमरावती, दि. 21 (जिमाका) : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने 'अंतर्गत महिलांना वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी मदत मिळावी आणि त्यांना कोणतीही अडचण आली तर निराकरण व्हावे म्हणून अमरावती येथील महिला बाल विकास भवनमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या सूचनेनुसार मदत कक्ष आणि 24X 7 तास  8432520301या क्रमांकाचा हेल्पलाइन नंबर  सुरू करण्यात आला आहे. या कक्षात आतापर्यंत हजार लाडक्या बहिणींनी फोन करून आपल्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ . कैलास घोडके  यांनी सांगितले.

 

             मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाचे महत्त्वाकांक्षी योजना असून याद्वारे लाभार्थी महिलांना प्रति माह पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यात युद्ध पातळीवर काम सुरू असून अंगणवाडी सेविका , बचत गटांच्या महिला अशा वेगवेगळ्या 15 नारीशक्ती दुतामार्फत हे काम सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख एकेचाळीस हजार लाडक्या बहिणीने आपली नोंदणी केली आहे . या योजनेअंतर्गत ज्यांना समस्या येतात त्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करून आपल्या समस्या सोडवून अंगणवाडी सेवेकडे नाव नोंदणी करीत आहे.

 

             महिला बालविकास विभागाकडील पर्यवेक्षिका मदत कक्षात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असे बारा तास सेवा देत असून उर्वरित वेळेत फोन द्वारे 24 तास सेवा देत आहेत. ग्रामीण भागातील महिलांना समजेल आणि त्यांना मदत होईल अशा भाषेत पर्यवेक्षिकांकडून  त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे संपर्क साधणाऱ्या महिलांचे समाधान झालेले दिसून येत आहे.

 

 

"महिला व बाल विकास भवन येथील महिला मदत कक्ष आणि हेल्पलाइन नंबर महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून याद्वारे महिलांना घरबसल्या आपल्या समस्यांचे निराकरण करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज भरणे सुकर होत आहे."

 

                                                 - मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीता मोहपात्रा 

    

 

 

तालुक्यानुसार प्राप्त अर्ज :

अमरावती   19372

भातकुली   15177

 तिवसा       11756

अचलपूर     26095

 अंजनगाव    6303

दर्यापूर        13904

चांदूरबाजार   15171

चांदुर रेल्वे     10367

धामणगाव     9365

नांदगाव       17020

वरूड          13478 

मोर्शी         13477

चिखलदरा   10470

धारणी       14980

नागरी भाग    44540

एकूण प्राप्त अर्ज  2 लाख 41 हजार 475

 

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 13.11.2024

  मतदार जनजागृती रॅलीत सजविलेली बैलगाडी आकर्षण अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती पंचायत समितीच्या स्विप उपक्रमांत पिंक फोर्स समितीने   शि...