मागासवर्गीय
विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु: 31 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित
अमरावती, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,
विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मागासवर्गीय
मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी
इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज
कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
सामाजिक न्याय
विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकिय वसतिगृहात
प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25
साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी अमरावती
स्थानिक वसतिगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालय पदवी, पदवीका, पदव्युत्तर प्रवेशासाठी
प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1 हजार मुलांसाठी शासकिय वसतिगृह युनिट
क्र.1, 2, 3 निंभोरा, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा व संत
गाडगे महाराज मुलांचे शासकिय वसतिगृह निंभोरा तसेच मुलींसाठी मागासवर्गीय मुलींचे
शासकिय वसतिगृह कॅम्प अमरावती, गुणवंत मुलींचे शासकिय वसतिगृह जेल रोड, अमरावती
तसेच विभागीय स्तरावरील 250 मुलींचे युनिट क्र. 4 अमरावती व 125 जयंती मागासवर्गीय
मुलींचे (नविन) विलास नगर, अमरावती तसेच तालुकास्तरावरील मुला-मुलींचे शासकीय
वसतिगृह कनिष्ठ महाविद्यालयीन पदवी, पदवीका, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश
अर्ज वाटपाबाबतची प्रक्रीया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित
वसतिगृहाकडे सादर करावे.
कनिष्ठ महाविद्यालय व
अव्यावसायिक अभ्याक्रम यांनी दि. 31 जुलैपर्यंत अर्ज करावा. तसेच व्यावसायिक
अभ्यासक्रमाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिध्द केले जाईल. अधिक माहितीसाठी
दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 वर संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment