संजय गांधी निराधार योजना समितीमध्ये
532 प्रकरणे मंजूर; पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा करावी
अमरावती, दि. 25 (जिमाका): संजय गांधी
निराधार योजना समितीच्या बैठक नुकतीच तहसिलदार संजय गांधी योजना, अमरावती शहर यांचे
कार्यालयात पार पडली. या बैठकीत एकूण 649 प्रकरणापैकी 532 प्रकरणे मंजूर करण्यात आली.
108 प्रकरणे त्रुटी असल्यामुळे तात्पुरती नामंजूर करण्यात आली तर 9 प्रकरणे अपात्र
ठरविण्यात आली आहे. मंजूर प्रकरणांपैकी संजय गांधी निराधार अनुदान योजनाचे 188 प्रकरणे,
श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनाचे 344 प्रकरणे आहेत. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी
खालील कागदपत्रे दि. 30 जुलै 2024 नंतर तहसिलदार संजय गांधी योजना कार्यालयात जमा करावीत,
असे आवाहन संजय गांधी योजना शहर अमरावती येथील तहसिलदार यांनी केली आहे.
क्युआर कोडव्दारे लाभार्थ्यांची
यादी उपलब्ध
प्रकरणे मंजूर करण्यात आलेल्या व त्रुटीतील
प्रकरणातील याद्या तहसिलदार संजय गांधी योजना अमरावती शहर प्रभाग अधिकारी, अमरावती
महानगरपालिका या कार्यालयामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच या याद्या www.amravati.gov.in
या संकेस्थळावर व क्युआर कोडव्दारे सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या
लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याचे पासबुक, आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते,
पासपोर्टसाईज फोटो, आधार कार्ड, छायांकित प्रत, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रे
जमा करावी, असे संजय गांधी योजना शहर अमरावती
येथील तहसिलदार शारंग ढोमसे यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment