जवाहर
नवोदय विद्यालय; इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
अमरावती, दि. 30 (जिमाका): जवाहर नवोदय विद्यालय अमरावती येथे शैक्षणिक सत्र
2025-26 करिता इयत्ता सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश
घेण्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन
जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.
नवोदय विद्यालय समितीचे अर्ज करण्याची
प्रक्रिया दि. 16 जुलैपासून सुरु झालेली आहे. इच्छुक विद्यार्थी नवोदय विद्यालय समिति
किंवा जवाहर नवोदय विद्यालय अमरावती च्या संकेतस्थळावर www.navodaya.gov.in किंवा
https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AMRAVATI/en/home/ निशुल्क अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. प्रवेश परीक्षा शनिवार
दि. 18 जानेवारी 2025 रोजी करण्याचे निर्धारित आहे. प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांने
जिल्ह्यातील रहिवासी व मान्यता प्राप्त शाळेतून
सत्र 2024-25 मध्ये वर्ग पाचवीत अध्यन करणारा असावा. अर्ज करतांना विद्यार्थ्यांना
स्वत:चा आधार कार्ड क्रमांकाने अर्ज करावा.
जर विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड नसेल तर त्याने सक्षम अधिकाऱ्याकडून रहिवासाचा
दाखला मिळवून अर्ज करता येईल. परंतु प्रवेश घेतांनी मात्र याच जिल्ह्यातील पत्ता असलेला
आधारकार्ड किंवा अमरावती जिल्ह्याती रहिवासी
असल्याचा पुरावा आवश्यक असेल. विद्यार्थ्यांच जन्म 1 मे 2013 ते 31 जुलै 2015 (सुरुवात व अंतिम दोन्ही दिवस समाविष्ट
दरम्यान असावा), जन्म तिथी आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थीं करिता सारखीच
आहे. अधिक माहिती करिता विद्यार्थ्यांने www.navodaya.gov.in किंवा
https://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/AMRAVATI/en/home/ संकेतस्थळावर भेट द्यावी.
किंवा प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अमरावती यांचेसी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे.
00000
No comments:
Post a Comment