निराधारांना डीबीटीमार्फत मिळणार अनुदान
अमरावती, दि. 16 (जिमाका): संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील
व्यक्तींना योजनांच्या माध्यमातुन महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते. हे मानधन
लाभार्थ्यांना तहसिलस्तरावरून बँकेत जमा केल्या जायचे. परंतु आता थेट डीबीटीमार्फत
निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग केले जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांचे
आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होईल. तरी लाभार्थ्यांनी
बँक खाते आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन
संजय गांधी योजना शहर विभागाचे तहसिलदार यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र निराधारांकडुन हयात असल्याचे
कागदपत्रे, बँक पुस्तक, आधारकार्ड, राशनकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, वीरपत्नी असल्यास
पतीचे मृत्यु प्रमाणपत्र व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांचे
अर्ज संकलित करण्याची प्रक्रीया तहसिलदार संजय गांधी योजना शहर विभाग अमरावती विभागाकडुन
सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती
योजनेचे लाभार्थी यांनी तात्काळ वरिल नमुद कागदपत्रे तहसिलदार संगायो अमरावती शहर कार्यालयात
सादर करावीत. वरील कागदपत्रे सादर न केल्यास लाभार्थ्यांना अनुदानापासुन वंचित राहावे
लागेल, याची नोंद घ्यावी.
00000
No comments:
Post a Comment