ऑफिसर क्लब येथे मत्स्यव्यवसाय उत्पादक शेतकरी व ग्राहक
मेळाव्याचे आयोजन
अमरावती, दि. 08 (जिमाका): प्रादेशिक उपायुक्त
मत्स्यव्यवसाय विभाग व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय
मत्स्य शेतकरी दिवसनिमित्य ऑफिसर क्लब, जुना बायपास रोड, अमरावती येथे बुधवार दि.
10 जुलै रोजी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मत्स्यव्यवसाय उत्पादक शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. तसेच मत्स्य पदार्थांचा खाद्य महोत्सवाचे आयोजन सायंकाळी 6
ते 9 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जिल्ह्यातील मत्स्य कास्तकार, व्यवसायिक,
व्यवसाय सहकारी संस्थाचे पदाधिकारी, सभासद व मत्स्य खवय्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन
मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एम.एम. मेश्राम यांनी केले आहे.
मेळाव्यामध्ये मत्स्य व्यवसायातील विविध
रोजगार संधी व त्यासाठी आवश्यक असणारी परीपूर्ण माहितीसह मत्स्यव्यवसायाशी निगडित विविध
विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन सत्र, विविध शासकीय योजनेची माहिती, मच्छीमारांच्या विकासासाठी
विविध कल्याणकारी योजना, मत्स्य व्यवसायाकरीता लागणाऱ्या सर्व साहित्याचे पुरवठादार
यांच्याबरोबर समन्वय मेळाव्याचा माध्यमातून संधी उपलब्ध होणार आहे.
मत्स्य पदार्थांचा खाद्य महोत्सव
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत ऑफिसर्स क्लब, अमरावती येथे दि.
10 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेदरम्यान मत्स्य पदार्थांचा खाद्य महोत्सवाचे आयोजन
करण्यात आले आहे. महोत्सवात अमरावतीकराना केवळ 499 रूपयामध्ये पोटभर चविष्ट मास्यांचा
आस्वाद घेता येणार आहे. ताज्या स्वच्छ मासळीपासून पारंपारिक घरगुती पद्धतीने तयार केलेले
मत्स्यपदार्थ अत्यंत रास्त दरात उपलब्ध आहे. लहान थोरांपासून वयोवृध्दापर्यंत सर्वांना
मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मासे खाल्लामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कर्करोग
हृद्यविकाऱ्यांसारख्या आजारामुळे होणारा मृत्यूचा धोका कमी होतो, लहान मुलांच्या मेंदूची वाढ होण्यास व बुद्धीचानाक्ष
होण्यास माशांमध्ये असलेल्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मदत करते. तसेच डोळ्यांची निगा राखण्याकरीता
मासे खाणे हे अत्यंत लाभदायक असतात.
000000
No comments:
Post a Comment