Friday, July 19, 2024

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पथकरात वारकऱ्यांना सुट

 

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पथकरात वारकऱ्यांना सुट

         अमरावती, दि. 19 (जिमाका): आषाढीवारीमध्ये मानाच्या दहा पालख्यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गावरुन पढंरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांच्या पालख्या, वारकरी व त्यांच्या वाहनांना पथकरातुन शासन परिपत्रकानुसार रविवार दि. 21 जुलैपर्यंत सुट देण्यात आली आहे. या पालख्यांना ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग व प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर वारकऱ्यांच्या हलक्या व जडवाहनांसाठी पथकरातून सुट देण्यासाठी पथकर सवलत पास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मोफत पास सुविधा उपलब्ध  करुन देण्यात येत आहे. तरी भाविकांनी सेवेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे  आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार