राष्ट्रीय
लोक अदालतीमध्ये एकूण 8086 प्रकरणांचा निपटारा;
24
कोटी 14 लक्ष रुपयांचा न्याय निवाडा
अमरावती, दि. 30 (जिमाका): येथील जिल्हा
व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दाखल प्रकरणांपैकी 4 हजार
390, प्रलंबित 2242 प्रकरणाचा तसेच विशेष मोहिमेतंर्गत
1434 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून एकुण 24 कोटी 14 लाख 64 हजार 51 रुपयांचा
न्यायनिवाडा करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथे शनिवार,
27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे
आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे
दिवाणी फौजदारी प्रकरणे बँकेचे प्रलंबित प्रकरणे,
चेक न बनवटण्याचे प्रकरणे (निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्ट) भुसंपादन प्रकरणे विवाह संबंधी
कायद्याचे दावे, बँकेचे तसेच दिवाणी आणि फौजदारी
अपील इतर दिवाणी प्रकरणे संबंधीत दाखलपूर्व प्रकरणे सुध्दा तडजोडीकरिता लोक अदालती
समक्ष ठेवण्यात आली होती. प्रकरणाची पुर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 42
मंडळाची निर्मिती करण्यात आली होती. ज्यामध्ये न्यायाधीश अधिवक्ता गण तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचा समावेश होता. जिल्हा
व सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
लोक अदालतीमध्ये संपुर्ण जिल्ह्यातून
41 हजार 402 दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व 4 हजार 390 प्रकरणांचा
तर 13 हजार 90 प्रलंबित प्रकरणांपैकी 2 हजार 242 प्रकरपणे अशा एकूण 6 हजार 632 प्रकरणाचा
यशस्वीरित्या निपटारा करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दि.
22 ते 26 जुलै 2024 पर्यंत विशेष मोहिमेतंर्गत 1 हजार 434 प्रकरणांचा निपटारा करण्यात
आला. अशाप्रकारे एकूण 8 हजार 66 प्रकरणांचा निपटारा या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये करण्यात
आला. लोक अदालतीच्या माध्यमातुन एकुण 24 कोटी 14 लक्ष 64 हजार 051 रूपये (चोवीस कोटी
चौदा लाख चौसष्ट हजार एक्कावन) तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा झाला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती
तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एम. आर. देशपांडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
मंगला कांबळे, इतर न्यायाधीश वर्ग, जिल्हा
वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. व्ही. एस. काळे तसेच जिल्हा वकिल संघ, सरकारी वकिल संघातील
सदस्य मार्गदर्शनाखाली लोक अदालत यशस्वीरित्या संपन्न झाली.
00000
No comments:
Post a Comment